Summer Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Soybean Sowing : उन्हाळ सोयाबीन खानदेशात कमी

Summer Crop : खानदेशात उन्हाळ सोयाबीनची पेरणी अनेकांनी टाळली आहे. याएेवजी भाजीपाला, फळ पिकांना शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात उन्हाळ सोयाबीनची पेरणी अनेकांनी टाळली आहे. याएेवजी भाजीपाला, फळ पिकांना शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. सोयाबीनची पेरणी मागील उन्हाळ हंगामात एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे तीन हजार हेक्टरवर झाली होती. धुळे जिल्ह्यातही काही शेतकऱ्यांनी उन्हाळ सोयाबीनची पेरणी केली होती. परंतु यंदा उन्हाळ सोयाबीन पेरणी खानदेशात कमी झाली आहे.

सोयाबीनची पेरणी डिसेंबर, जानेवारीत झाली आहे. अनेकांनी कापूस व अन्य पिकांखालील रिकाम्या झालेल्या क्षेत्रात सोयाबीनची पेरणी केली होती. सोयाबीन पीकदेखील चार ते साडेचार महिन्यांचे आहे. सध्या पीक वाढीच्या स्थितीत आहे.

काही भागात पीक मळणीवर येत आहे. परंतु यंदा सोयाबीन पेरणी खानदेशात कमी झाली असून, कमी दर व अधिकचा खर्च यामुळे ही पेरणी कमी झाल्याची स्थिती आहे. उन्हाळ हंगामासाठी विशेष सोयाबीन बियाणेदेखील बाजारात नाही.

शेतकरी आपल्या घरातील बियाण्यावर प्रक्रिया करून त्याची पेरणी करीत होते. त्यात मागील वेळेस काहींना अपयश आले किंवा पेरणी यशस्वी झाली नाही. काहींनी पेरणी केली, पण उत्पादन कमी आले.

सोयाबीनची पेरणी खानदेशात सुमारे तीन हजार हेक्टरवर झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील पेरणी सुमारे २२०० हेक्टरवर आहे. नंदुरबारातील पेरणी अल्प अल्याची माहिती मिळाली. मागील हंगामात कृषी यंत्रणांनी तेलबिया उत्पादनवाढीसंबंधी सोयाबीन पेरणीला प्रोत्साहन दिले होते.

भाजीपाला पिकांना पसंती

अनेकांनी उन्हाळ सोयाबीनएेवजी भाजीपाला पिकांना पसंती दिली आहे. त्यात गवार, काशीफळ, भोपळा, कलिंगड, काकडी आदी पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली. काहींनी भुईमूग पेरणी केली. यामुळे सोयाबीनचे क्षेत्र वाढले नाही.

कमी दरांचा परिणाम

सोयाबीनचे दर दबावात आहेत. खरिपातही हवे तसे दर सोयाबीनला मिळाले नाहीत. सध्यादेखील सोयाबीनचे दर ३५०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल, असेच आहेत. यात उन्हाळ्यात सिंचन, फवारण्या व अन्य कार्यवाही यात अधिकचा खर्च लागतो. यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळ सोयाबीन पेरणी टाळली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT