Water Storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : खडकपूर्णा, नळगंगा, पेनटाकळी यंदा तुडूंब

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प यंदा चांगल्या पावसामुळे तुडूंब भरले आहेत. दोन वर्षांनंतर प्रथमच खडकपूर्णा हा मोठा प्रकल्प पूर्ण भरला आहे. इतरही प्रकल्पांमध्ये मोठा साठा या वर्षी तयार झाल्याने पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामाची चिंता मिटली आहे.

यंदा जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ झाले आहेत. पुढील महिन्यात सुरू होत असलेल्या रब्बी हंगामासाठी जमिनीतही पुरेशी ओल आहे. शिवाय प्रकल्पातून आवर्तने मिळणार आहेत. त्यासाठी पुढील महिन्यात होणाऱ्या पाणी वाटप समितीच्या बैठकीत निर्णय होईल. जिल्ह्यात लहानमोठे मिळून ५१ प्रकल्प आहेत.

त्यामध्ये सध्या ३९९४८ दलघमी पाणीसाठा असून तो सरासरी ८४ टक्के एवढा आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात ९२ पैकी ८६ मंडलांमध्ये अवर्षणसदृश स्थिती होती. लोणार आणि बुलडाणा तालुक्यांत नंतर दुष्काळही जाहीर झाला होता. त्या पार्श्वभूमीवर यंदा परिस्थिती अधिक चांगली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरासरी दीड लाख हेक्टरऐवजी अडीच लाख हेक्टरवर रब्बीची लागवड पोचलेली आहे.

यंदा प्रकल्पामध्ये मुबलक साठा

जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत खडकपूर्णा प्रकल्पात शून्य टक्के साठा होता. मात्र, नंतर धरण क्षेत्रात जोमदार पाऊस पडल्याने या प्रकल्पातील साठा वाढला. दोन वर्षांपूर्वी हा प्रकल्प भरला होता. यंदा मात्र, सर्वाधिक पाणीसाठा झालेला आहे. सध्या प्रकल्पात ९४.४० टक्के एवढा साठा असून गेल्यावर्षी आजच्या तारखेत केवळ ५.६० टक्के इतकाच साठा होता.

नळगंगा या दुसऱ्या प्रकल्पातही यंदा ८०.११ टक्के साठा आहे. गेल्या वर्षात २८.७७ टक्के एवढा साठा होता. पेनटाकळीतही सध्या ९५.१७ टक्के साठा असून गेल्यावर्षीच्या तुलनेत सुमारे ४५ टक्के साठा अधिक आहे. या वर्षी खडकपूर्णा प्रकल्पातून नदीपात्रात दोन ते तीन वेळा विसर्ग केलेला आहे. दुसरीकडे इतर प्रकल्पांतूनही यंदा विसर्ग झाला. सध्या आवश्यक असलेला साठा ठेवत उर्वरित पाणी या माध्यमातून नदीपात्रात सोडण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT