Dog Bite Agrowon
ॲग्रो विशेष

Dog Bite : श्वान दंश टाळण्यासाठी हात खाली ठेवा, जमिनीकडे पहा ः डॉ. भिकाने

Team Agrowon

Latur News : श्वानदंश टाळणेसाठी श्वानाची मानसिकता जाणून घ्या. पळू नका.ओरडू नका किंवा श्वानावर कांही फेकू नका. झोपलेल्या वअन्न खात असलेल्या किंवा पिलाची काळजी घेणाऱ्या श्वानाला त्रास देवू नका.

गुरगुरणारा श्वान जवळ आल्यावर पळू नका  व स्थिर उभे रहा. आपले हात खाली शरीराजवळ ठेवा व जमिनीकडे पहा. श्वानाकडे थेट बघू नका, असा सल्ला महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे (माफसु) विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी विद्यार्थ्यांना दिला.

माफसु विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त उदगीरच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या वतीने जानापूर (ता. उदगीर) येथील चंगळामाता आश्रमशाळेत जागतिक रेबीज दिनाचे औचित्य साधून आयोजित रेबीज जनजागृती अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड अध्यक्षस्थानी होते. शाळेचे मुख्याध्यापक अशोक बिरादार, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बस्वराज पाटील, पर्यवेक्षक किशोर अचवले, उन्नत भारत अभियान योजनेचे समन्वयक डॉ. प्रशांत मसारे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. भिकाने म्हणाले, की रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये ४० टक्के मृत्यू हे १५ वर्षाखालील मुलांत होतात.

यामुळे रोगाचे  निर्मुलन करावयाचे असेल तर शाळकरी विद्यार्थ्यात श्वानंदंशाबद्दल जागृती करणे हे गरजेचे आहे. रेबीज झाल्यानंतर मृत्यू अटळ असतो परंतु श्वानदंश झाल्यावर तत्काळ प्रभावी उपाय केल्यास शंभर टक्के रोग टाळता येतो.

शिक्षक व विद्यार्थ्यांनी रेबीज या आजाराविषयी शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून कुटुंब व गावांमध्ये रेबीजबद्दल जनजागृती करून या आजाराचे निर्मुलन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. रेबीजचे २०३० पर्यंत जगातून समुळ उच्चाटन करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E Peek Pahani : शेतकरी स्तरावरील पीकपेरा नोंदणी ६२ टक्क्यांवर थांबली

Rain Update : परभणी, हिंगोलीत २५ मंडलात सरासरीहून कमी पाऊस

Water Scarcity : वसई-विरारकरांची पाणी समस्या मिटणार

Paddy Disease : भातावर बगळ्या, तर नागलीवर करप्याचा प्रादुर्भाव

Pm Kisan Installment : नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या हप्त्याचं ५ ऑक्टोबरला होणार वितरण

SCROLL FOR NEXT