Chhatrapati Shivarai Kesari Wrestling Tournament Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Kesari : राज्य कुस्तीगीर परिषद घेणार कर्जतला ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा

Wrestling Competition : राज्य कुस्तीगीर महासंघाने अहिल्यानगरला ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा घेतल्यानंतर आता राज्य कुस्तीगीर परिषदही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर जिल्ह्यातच घेत आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : राज्य कुस्तीगीर महासंघाने अहिल्यानगरला ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा घेतल्यानंतर आता राज्य कुस्तीगीर परिषदही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर जिल्ह्यातच घेत आहे.

कर्जत येथे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने २७ ते ३० मार्च दरम्यान ही स्पर्धा होत असून त्याची तयारी सुरू झाली आहे. स्पर्धेसाठी राज्यातून ९०० मल्ल, दोनशे पंचांसह पदाधिकारी मिळून सुमारे बाराशे लोकांचा राबता असेल, असे सांगण्यात आले.

महाराष्ट्राच्या मातीमधील कुस्ती या अस्सल खेळाच्या प्रतिष्ठेसाठी मामासाहेब मोहोळ यांनी राज्य कुस्तीगीर परिषद स्थापन करुन ‘महाराष्ट्र केसरी’ हा राज्यातील कस्तीमधील सर्वोच्च किताब सुरू केला. सुरुवातीला रोख बक्षीस व १९८२ पासून मामासाहेब मोहोळ कुटुंबाकडून विजेत्याला १.५ किलोग्रॅम वजनाची चांदीची गदा देऊ लागले.

२००८ पासून गदेसह ५१ हजारांचे रोख बक्षीस सुरू झाले व त्यात पुढे वाढ होत गेली. विजेत्यांना क्रीडा कोट्यातून सरकारी नोकऱ्या दिल्या जाऊ लागल्या. अलीकडच्या काही वर्षांपासून मात्र संघटनेत आणि पर्यायाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत राजकारण सुरू झाले.

राज्य पातळीवर परिषदेला समकक्ष महासंघ स्थापन झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून दोन वेगवेगळ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होऊ लागल्या आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व महाराष्ट्र राज्य आॅलिंपिक असोसिएशनच्या मान्यतेने कर्जत तालुका तालीम संघाकडून कर्जत (जि. अहिल्यानगर) येथे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा होत असल्याचे जाहीर केले आहे. बक्षीस वितरणाला ज्येष्ठनेते शरद पवार यांना उपस्थित राहता यावे त्या दृष्टीच्या नियोजनानुसार २७ ते ३० मार्च या काळात ही स्पर्धा होईल.

स्पर्धा नेमकी कितवी

अहिल्यानगर येथे नुकतीच ६७ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्याचे राज्य कुस्तीगीर महासंघाने जाहीर केले. आता कर्जत (जि. अहिल्यानगर) येथे होत असलेली ही स्पर्धा ६६ वी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे स्पर्धा नेमकी कितवी. असा प्रश्‍न पडला आहे.

राज्यातील सर्वांत जुनी असलेल्या राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने कर्जत (जि. अहिल्यानगर) येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेत आहोत. पंचांनी व्यवस्थित निकाल दिला नसल्याने अहिल्यानगर येथे झालेल्या स्पर्धेला डाग लागला. कुस्तीत पारदर्शकता असावी यासाठी आम्ही कर्जत येथे होत असलेल्या स्पर्धेसाठी अंतिम ससाण्याला भारतीय कुस्ती संघात काम करणारे पंच आणणार आहोत. कुस्ती स्पर्धेत लागलेला डाग पारदर्शकतेतून पुसणार आहोत.
- ऋषिकेश धांडे, अध्यक्ष, कर्जत तालुका कुस्तीगीर संघ, जि. अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rahul Gandhi: देशात आर्थिक संकटाचं वादळ येतंय, शेतकऱ्यांना झळ बसणार, राहुल गांधींनी व्यक्त केली चिंता

Farmer Protest: जामसंडेत आंबा-काजू बागायतदारांचे आंदोलन

Agricultural Awareness Program: सोनवळा येथे विज्ञानाधारित निविष्ठा जागरूकता कार्यक्रम

Wedding Book Gifting: फेट्यांच्या मानपानाऐवजी पुस्तकरूपी भेट

Nutrient Management: शास्त्रोक्त अन्नद्रव्य व्यवस्थापन काळाची गरज : तांबडे

SCROLL FOR NEXT