Kaneri Math Agrowon
ॲग्रो विशेष

Kaneri Math : कणेरी मठ राबविणार समग्र ग्राम विकास प्रकल्प

Village Development Project : गावातच रोजगार निर्मितीचे प्रयत्न; पहिल्या टप्प्यात वीस गावांत काम सुरू

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Kolhapur News : कोल्हापूर ः कणेरी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्घगिरी संस्थान मठाच्‍या वतीने गावे समृद्ध करण्यासाठी समग्र ग्राम विकास प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. गावची अर्थव्यवस्था मजबूत होऊन गावांचा विकास साधला जावा हा प्रमुख हेतू लक्षात ठेवून शंभर गावांमध्ये हा प्रकल्‍प राबविण्याची संकल्पना आहे.

गावातील गरजा गावातच पूर्ण व्हाव्यात यासाठी लागणारी उत्पादने गावातच तयार व्‍हावी यासाठी गावपातळीवर नवीन उद्योजक निर्माण केले जाणार आहेत. पहिल्या टप्‍प्यात जिल्‍ह्यातील २० गावांत हा प्रकल्‍प प्राधान्याने राबविण्यात येईल.

श्री क्षेत्र सिद्घगिरी संस्थान मठाचे मठाधिपती श्री काडसिद्घेश्‍वर महाराज यांनी मंगळवारी (ता. ३०) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शेती, शिक्षण, आरोग्य, उद्योग, संस्कृती या पाच विभागांमध्ये संबंधित गावात हे काम करण्यात येईल. यामध्ये शासकीय योजनांचा लाभ ही ग्रामस्‍थांना देण्यात येईल.

कणेरी मठाचे पदाधिकारी, ग्रामस्‍थ, शासकीय अधिकारी यांची गावपातळीवर समिती असेल. ही समिती गावातील शेती, शेतीपूरक उद्योगाची सुधारणा करण्याबरोबर शिक्षण, आरोग्य, उद्योग, आदी सुविधा देण्यासाठीही प्रयत्न करेल. विविध योजनासाठी जिल्हा परिषदेसह अन्य शासकीय संस्थांशी सामंजस्य करारही करण्यात येत आहेत.

शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा, खते, अवजारे गावातच तयार करण्यासाठी मठ प्रोत्साहन देईल. याचबरोबर तयार होणाऱ्या शेतीमालासाठी मार्केटिंगची सुविधा ही मठाच्या वतीने देण्यात येईल. ज्या गावातील शिक्षण संस्था मोडकळीस आल्या असतील तर त्यांत सुधारणा करणे, नवीन शिक्षणाच्‍या सोयी गावातच देणे, आदी कामे केली जातील. आरोग्य सेवेअंतर्गच आयुष्यमान कार्ड काढून ग्रामस्‍थांचे उपचार गावातच करण्यासाठी प्राधान्‍य देणे आदी बाबी राबविण्यात येणार आहे.


‘सूत्रबद्ध पद्धतीने प्रकल्प राबविणार’
पहिल्या टप्प्यात वीस गावांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून आता येथे काम सुरू झाले आहे. या बाबतची ग्रामस्‍थांची पहिली बैठक ८ फेब्रुवारीला मठावर होणार आहे. यामध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग विभागात ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी देशभरातील तज्‍ज्ञ मार्गदर्शन करतील.

शेती उद्योगासाठी आर्थिक मदत बँकांकडून मिळवून देण्यासाठी मठ प्रयत्न करेल. हा प्रकल्‍प मोहीम म्हणून राबविण्‍यात येणार आहे. यासाठी गावातील प्रमुखच या सर्व सुविधा देण्यासाठी पुढाकार घेतील. मठाच्या वतीने आराखड्यावर काम करुन तो पूर्ण करण्‍याला प्राधान्य दिले जाणार आहे. अगदी सूत्रबद्ध पद्धतीने हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्‍याचे श्री. काडसिद्धेश्‍वर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: खरबुजाला चांगला उठाव; सोयाबीनमध्ये सुधारणा, कापूस भाव दबावातच, कोथिंबीरला उठाव तर मक्याला संथ उठाव

Rural Development Works: बांधकाम विभागाची ५३२ पैकी २५२ कामे पूर्ण

Sindhudurg Weather: सिंधुदुर्गात सकाळी धुके, दुपारी कडक ऊन

Local Politics: भाजपची ७, तर राष्ट्रवादीची एका ठिकाणी गटनोंदणी

Farmer Loan Repayment: सलग तीन वर्षे कर्जफेड करणाऱ्यांची माहिती द्या

SCROLL FOR NEXT