Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : कळवण, चांदवडला गारपिटीचा तडाखा

कळवण तालुक्यात पहिल्या टप्प्यात रब्बी हंगामात उन्हाळा कांदा लागवडी पूर्ण झाल्या आहेत. आता कांदा वाढणीच्या अवस्थेत आहे.

Team Agrowon

Nashik News ः जिल्ह्याच्या विविध भागांत शनिवारपासून (ता. ४) वादळी वाऱ्यासह पावसाचे संकट घोंगावत आहे. असे असताना सणासुदीत रविवारी (ता. ५) व सोमवारी (ता. ६) सलग दोन दिवस वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाने अनेक तालुक्यांना झोडपून काढले.

मंगळवारी (ता. ७) पावसाने काहीशी उसंत दिली होती; मात्र कळवण व चांदवड तालुक्यांना गारपिटीचा तडाखा बसला. यामध्ये काढणीसाठी येणाऱ्या उन्हाळ कांद्याचे मोठे नुकसान झाले.

कळवण तालुक्यात पहिल्या टप्प्यात रब्बी हंगामात उन्हाळा कांदा लागवडी पूर्ण झाल्या आहेत. आता कांदा वाढणीच्या अवस्थेत आहे; अशात शनिवारी (ता. ४) तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने दणका दिल्याने हिरवी मिरची व टॉमॅटो लागवडींचे नुकसान झाले.

त्यांनतर चौथ्या दिवशी मंगळवारी (ता. ७) गारपीट झाल्याने उन्हाळ कांदा पिकाचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे.

कळवण तालुक्यात संध्याकाळी ६ नंतर बेज, बागडू, नाकोडा, भेंडी परिसरात अर्धा तास गारांसह पाऊस पडला. त्यामुळे रब्बी हंगामातील कांदा पीक धोक्यात येणार आहे. तर इतर ठिकाणी हलका पाऊस आणि विजांचा कडकडाट होता.

चांदवड तालुक्यातही सायंकाळी वादळी वाऱ्यांसह पाऊस व गारपिटीने गहू, कांदा आणि द्राक्ष पिकांचे नुकसान झाले. रात्री ८ च्या सुमारास वागदर्डी, खेलदरी व मनमाड परिसरात गारा पडल्याने मोठ्या प्रमाणात गहू व कांदा या पिकांचे नुकसान झाले.

रात्री ९.३० च्या सुमारास हलकी गारपीट आडगाव टप्पा परिसरात झाली. त्यामुळे लेट रब्बी हंगामातील काढणीस लेट खरीप कांदा व काढणीसाठी येत असलेला रब्बी उन्हाळ कांदा खराब होण्याची शक्यता आहे.

वादळी वारा व गारपिटीमुळे गहू पिकाचे नुकसान झाले आहे; मात्र उन्हाळा कांद्यालाही या गारपिटीचा तडाखा बसला आहे. सध्या कांदा पिकाचे नुकसान झाले असले तरी कांदा काढणी पश्चात तो योग्य साठवणूक करूनही राहणार नाही. त्यामुळे कांदा तातडीने मिळणाऱ्या भावात विकावा लागणार आहे. कारण कांदा साठवल्यास तो सडण्याची भीती आहे.
घनश्याम पवार, शेतकरी, नवी बेज, ता. कळवण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT