Highly sensitive leopard prone villages Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Problems : बिबट्या समस्या निवारणासाठी जुन्नर अतिसंवेदनशील जाहीर

Highly Sensitive Leopard Prone Villages : जुन्नर तालुक्यातील बिबट्या समस्या ही नैसर्गिक आपत्ती असून, आपत्ती निवारणासाठी बिबट्या प्रवण गावे अतिसंवेदनशील जाहीर करण्यात येतील.

Team Agrowon

Pune News : जुन्नर तालुक्यातील बिबट्या समस्या ही नैसर्गिक आपत्ती असून, आपत्ती निवारणासाठी बिबट्या प्रवण गावे अतिसंवेदनशील जाहीर करण्यात येतील. तसेच बिबट्यांचे हल्ले मुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. विविध उपाययोजनांसाठी तातडीचा साडेतीन कोटींचा निधी मंगळवारी (ता. १५) वितरित केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली.

पिंपरी पेंढार गावात नुकत्याच झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर माजी आमदार शरद सोनवणे यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन केले होते.

या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी वन विभागाचे मुख्यवन संरक्षक एन. प्रवीण, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार सुनील शेळके, शिवसेनेचे (ठाकरे गट) माऊली खंडागळे, ‘विघ्नहर’चे अध्यक्ष सत्यशील शेरकर, देवराम लांडे, शरद लेंडे, बाबू पाटे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी विशेष पट्टे

शेतकरी शेतात खाली बसलेला असताना बिबट्यांचे हल्ले झाले आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांना गळ्यात काटेरी विशेष पट्टे सीमू सॉफ्ट कंपनीने बनविले आहे. या पट्ट्याचे सादरीकरण या वेळी सुनील चोरे यांनी केले. हे पट्टे रास्त दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा विचार वन विभाग करत असल्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT