Leopard Attack : पीक जाऊ दे वाया; जीव महत्त्वाचा ; करमाळ्यात शेतकऱ्यांचे शेतात जाणेच बंद

Leopard : करमाळ्यातील शेतकऱ्यांची भावना
Leopard Attack
Leopard AttackAgrowon
Published on
Updated on

Karmala News : करमाळा : करमाळा तालुक्यातील अनेक भागातून बिबट्यासदृश प्राणी दिसल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे, त्यामुळे पिकांचे नुकसान होऊ दे, जीव महत्त्वाचा अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. याबाबत वनविभागाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे. मागील दोन-तीन वर्षांपूर्वी करमाळा तालुक्यात बिबट्याने माणसांवर हल्ला करून जीव घेतल्याने बिबट्या आल्याची बातमी समजताच या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पिकांचेही नुकसान होत आहे.

मागील महिन्याभरापासून करमाळा तालुक्यातील रायगाव, कोर्टी, राजुरी, उमरड, वाशिंबे, पोंधवडी, उंदरगाव, मोरवड, विहाळ या परिसरात बिबट्या दिसल्याचे शेतकरी सांगत आहेत. याबाबत वन विभागाकडे संपर्क केला असता, वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मात्र बिबट्या नसून हे तरस असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, बिबट्या आला या भीतीने शेतकरी शेतात जाणे टाळू लागले आहेत. सध्या शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर तिथे असताना देखील शेतकरी बिबट्याच्या भीतीपोटी शेतात जाणे टाळत आहेत. मागील तीन-चार वर्षांपूर्वी करमाळा तालुक्यात बिबट्याने हल्ला केल्याने दोन जणांचा मृत्यू झाला होता. ही भीती अद्याप लोकांच्या मनात आहे. त्यामुळे वन विभागाने तत्काळ यावर उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Leopard Attack
Junnar Leopard Attack : बिबट्यांना पकडण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा

पिकांचे नुकसान

बिबट्या आल्याच्या बातमी पसरल्याने शेतकरी शेतात जात नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. काही जणांच्या खरिपाच्या सुगी सुरू आहेत, तर काही ठिकाणी रब्बीच्या पेरणीची लगबग सुरू आहे. त्यामुळे शेतात काम असणाच्या दिवसांत अशा प्रकारच्या बातम्यांमुळे शेतकरी घाबरला आहे. त्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

उंदवडी परिसरात शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिल्याचे खात्रीशीर सांगितले आहे याबाबत वनविभागाला संपर्क साधला असता वनविभागाचे अधिकारी आवश्यक प्रतिसाद देत नसल्याचे जाणवले शेतकरी बिबट्या आल्याने घाबरलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे वनविभागाने यावरती वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

- मनोहर कोडलिंगे, सरपंच, पोंधवडी, ता. करमाळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com