Parbhani News : जून महिन्यात परभणी जिल्ह्यात सरासरी १४५.३ मिमी पाऊस अपेक्षित आहे. परंतु यंदा (२०२५) प्रत्यक्षात ७९.६ मिमी (५४.८ टक्के), तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी १६९.२ मिमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात सरासरी १३३.८(७९.१ टक्के) पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत परभणी जिल्ह्यात ६५.७ मिमी, तर हिंगोली जिल्ह्यात ३५.४ मिमी कमी (तूट) पाऊस झाला.
या दोन जिल्ह्यांतील ८२ पैकी ७६ मंडलांमध्ये सरासरीहून कमी पाऊस झााला असून, त्यात १०० मिमी पेक्षा कमी पाऊस झालेल्या १८ मंडलांचा समावेश आहे. जून २०२४ मध्ये परभणी जिल्ह्यात १७०.४ मिमी (११७.३ टक्के), तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी १४९.८ मिमी (८८.५ टक्के) पाऊस झाला होता.
परभणी जिल्ह्यात जून महिन्यात २०२० ते २०२५ या ६ पैकी ३ वर्षी सरासरीहून कमी तर ३ वर्षात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. यंदा ५२ पैकी ४८ मंडलांत सरासरीहून कमी पाऊस झाला. केवळ ६ मंडलांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. ३९ मंडलांत १०० मिमीहून कमी, तर १३ मंडलांत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
सर्वांत कमी चिकलठाणा (ता. सेलू) मंडलात ३५.१ मिमी (२३ टक्के), तर सर्वाधिक राणीसावरगाव (ता.गंगाखेड) मंडलात २३२.८ मिमी (१९२.७ टक्के) पाऊस झाला. केवळ पूर्णा तालुक्यात सरासरीहून अधिक पाऊस झाला. जिल्ह्यात जूनमध्ये ९ पर्जन्य दिनाची (रेन डे) नोंद झाली.
हिंगोली जिल्ह्यात सलग चौथ्या वर्षी जून मध्ये सरासरीहून कमी पाऊस झाला आहे. ६ पैकी ४ वर्षी सरासरीहून कमी, तर २ वर्षी जास्त पाऊस झाला. यंदाच्या जूनमध्ये जिल्ह्यातील ३० पैकी २८ मंडलांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
त्यात ५ मंडलांत १०० मिमीहून कमी पाऊस झाला आहे. सर्वांत कमी पाऊस नांदापूर मंडलांमध्ये ८३.५ मिमी (४८.५टक्के), तर सर्वाधिक हट्टा (ता. वसमत) मंडलामध्ये १९५.२.६ मिमी (१२०.२ टक्के) पाऊस झाला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.