Ladki Bahin Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Scheme: लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता आजपासून मिळणार; ३६०० कोटींच्या निधीला मंजुरी

June 2025 Installment: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता सोमवारी (३० जून) पासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी सरकारने ३६०० कोटी रुपये मंजूर केले असून अपात्र लाभार्थ्यांवर कडक कारवाई होणार आहे.

Roshan Talape

Pune News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झाले असून, आतापर्यंत ११ हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर जून महिन्याचा हप्ता सोमवारी (ता. ३०) जमा होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. तसेच या हप्त्यासाठी ३६०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत असेही स्पष्ट केले.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.२९) झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी ही माहिती दिली. अजित पवार यांनी सांगितले की, “महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू असलेली ही योजना पुढेही नियमितपणे सुरू राहणार आहे.”

दरम्यान, हप्ता उशिरा मिळत असल्याने एकत्रित रक्कम मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, यावेळी फक्त जूनचाच हप्ता जमा होणार आहे, हे स्पष्ट करण्यात आले आहे.

अपात्र लाभार्थ्यांवर होणार कारवाई

अपात्र महिलांचा गैरवापर रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. काही महिलांनी अयोग्य माहिती देऊन लाभ घेतल्याचे उघड झाल्यानंतर प्राप्तिकर विभाग त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची तपासणी करत आहे. ज्यांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.

अर्जांची पडताळणी आधार आणि प्राप्तिकर माहितीच्या आधारे केली जात आहे. ही योजना फक्त गरजू आणि पात्र महिलांसाठीच असणार आहे. त्यामुळे चुकीची माहिती देऊन लाभ मिळविणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळले जाणार आहे.

सरकारने पारदर्शकतेसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार ही योजना नियमित सुरू ठेवणार असून, खरी गरजूंना आर्थिक मदत मिळावी, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT