Jowar Production agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Production : सोलापूर जिल्ह्यात रब्बीमध्ये ज्वारी उत्पादन घटलं; मका, हरभरा, गव्हाचे क्षेत्र वाढलं

Solapur Rabi Season : गहू, हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकूण ९१ टक्के क्षेत्रावर रब्बीच्या विविध पिकांची पेरणी झाली आहे. याबाबतची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे.

sandeep Shirguppe

Jowar Production Decreased Solapur : राज्यात ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर जिल्हा नेहमी अग्रेसर असतो परंतु यंदा रब्बीच्या पेरणीत सरासरीच्या ७६ टक्के क्षेत्रावर ज्वारी पेरणी झाली आहे. या तुलनेत गहू, हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकूण ९१ टक्के क्षेत्रावर रब्बीच्या विविध पिकांची पेरणी झाली आहे. याबाबतची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे.

सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरणीचा कालावधी जवळपास संपला आहे. मका पेरणी होऊ शकते. यंदा उशिरापर्यंत पाऊस पडल्याने ज्वारीचा पेरा कमी झाला आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाणी पुरेसे आहे. असे कृषी अधिकारी भोसले यांनी सांगितले.

इतर पिकांना प्राधान्य

राज्यात सोलापूर, लातूर, अहिल्यानगर, यासह काही जिल्ह्यात कमी जास्त प्रमाणात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. सोलापूर जिल्हा ज्वारी उत्पादनात अग्रेसर जिल्हा अशी ओळख आहे; मात्र मागील काही वर्षांत ज्वारी पिकाचे उत्पादन कमी होऊन इतर पिकांना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. यामुळे बाजारातील परिस्थितीनुसार शेतकऱ्यांनीही पीक पद्धतीत बदल केल्याचे दिसत आहे.

यंदा सोलापूर जिल्ह्याचे ज्वारी पेरणी सरासरी क्षेत्र तीन लाख १८ हजार हेक्टर इतके आहे. प्रत्यक्षात दोन लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेर झाली आहे. सरासरीच्या ७६ टक्के इतकीच ज्वारी पेरणी झाली आहे. गहू, हरभरा व मका पेरणी क्षेत्रात सरासरीपेक्षा वाढ झाली आहे. गहू ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक, हरभरा ६६ हजार तर मका ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरा झाला आहे.

पंढरपूर तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढलं

सोलापूर जिल्ह्यात रब्बी हंगामात ६६ हजार हेक्टर क्षेत्रावर नव्याने ऊस लागवड झाली आहे. पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक १३ हजार ५०० हेक्टर, माळशिरस तालुक्यात ९ हजार ५०० हेक्टर, मोहोळ ८ हजार हेक्टर, करमाळा ६ हजार हेक्टर, अक्कलकोट ५ हजार ५५६ हेक्टर, दक्षिण पाच हजार ४०० हेक्टर, माढ्यात पाच हजार २०० हेक्टर, उत्तर सोलापूर पाच हजार हेक्टर, सांगोल्यात ३३०० हेक्टर, मंगळवेढा ३१०० हेक्टर तर बार्शीत सतराशे हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT