Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Factory Update : ‘कारखाने तपासणीसाठी संयुक्त पथक नेमा’, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Inspection of Factory : अन्न औषध प्रशासन, औद्योगिक विकास महामंडळ व पोलिस प्रशासन विभागाने संयुक्त पथक नेमून तपासणी करावी,’’ अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.

Team Agrowon

Solapur News : ‘‘जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील औषध तयार करणाऱ्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही अमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता अन्न व औषध प्रशासन विभागाने घेऊन, वेळोवेळी कारखान्यांना भेट द्यावी. यासाठी अन्न औषध प्रशासन, औद्योगिक विकास महामंडळ व पोलिस प्रशासन विभागाने संयुक्त पथक नेमून तपासणी करावी,’’ अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्हास्तरीय नार्को को- ऑर्डिनेशन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचना दिल्या. बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) डॉ. उमेश काकडे, केंद्रीय गुप्त वार्ता उपायुक्त किशोर कनकी, कस्टम विभाग अधीक्षक संजय कुमार, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त सचिन कांबळे, अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब कांबळे, राज्य उत्पादन शुक्ल अधीक्षक नितीन कांबळे, विद्यापीठाचे कुलसचिव एसी. पी. सोनकांबळे आदी उपस्थित होते.

आशीर्वाद म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवून त्यांच्याकडून कोणताही अमली पदार्थ किंवा नशाकारक पदार्थाची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. पोलिस प्रशासनाने अंमल पदार्थांच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबवून अमली पदार्थांची वाहतूक व साठवणूक विक्री करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी. तसेच जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यांची माहिती घेऊन अमली पदार्थ तयार होत असतील, अशा कंपन्यांवरही कारवाई करावी.’’

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना

औद्योगिक विकास महामंडळाने नोंदणीकृत व सध्या बंद असलेल्या रासायनिक कंपन्यांची माहिती सादर करावी.

जिल्ह्यात गांजा व खसखस पिकांची लागवड होणार नाही, यासाठी कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सेवकांची कृषी विभागाने नेमणूक करावी.

दुर्गम भागात वेळोवेळी भेटी देऊन अमली पदार्थांची लागवड होणार नाही, याची दक्षता वन विभागाने घ्यावी.

अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या लोकांवर उपचार तसेच समुपदेशनातून जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य विभागाने करावे.

जिल्ह्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत चर्चासत्र व वादविवाद स्पर्धाचे आयोजन करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT