NAFED President Agrowon
ॲग्रो विशेष

NAFED President : ‘नाफेड’च्या अध्यक्षपदी जेठाभाई भारवाड

Jethabhai Bharwad : महाराष्ट्रातून देवळ्याचे केदा आहेर संचालकपदी निवड

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Indian National Federation of Agriculture, Cooperatives and Marketing : नाशिक : भारतीय राष्ट्रीय कृषी, सहकार व विपणन महासंघाच्या (नाफेड) २१ संचालक मंडळासाठी झालेल्या निवडणुकीत १५ उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर ६ जागांसाठी दिल्ली येथे भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या मुख्यालयात निवडणूक पार पडली. त्यासाठी २७ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजपचे वर्चस्व दिसून आले.

संचालक मंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता. २२) अध्यक्षपदी जेठाभाई भारवाड यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी कर्नाटकचे सिद्धप्पा होट्टी आणि पंजाबचे तरलोक सिंग या दोघांची निवड झाली आहे. तर महाराष्ट्रातून देवळा (जि. नाशिक) येथील भाजप नेते केदा आहेर हे संचालकपदी मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. यापूर्वी पश्‍चिम विभागातून लासलगाव येथील नानासाहेब दत्ताजी पाटील यांनी संचालक म्हणून काम पाहिले आहे.
भारवाड हे गुजरात विधानसभेचे उपसभापती, पंचमहाल दूध संघ आणि पंचमहाल जिल्हा सहकारी (पीडीसी) बँकेचे अध्यक्षही आहेत. तर आहेर हे नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत. पश्‍चिम विभागातून ते विजयी झाले. त्यांनी संजय होळकर व सुषमा भोईटे यांचा पराभव केला.

पूर्व विभागातून विशाल सिंग यांनी ‘नाफेड’चे उपाध्यक्ष राहिलेले व बिहारचे राष्ट्रीय जनता दलाचे विधान परिषद सदस्य सुशील कुमार सिंग यांचा पराभव केला. उत्तर विभागातून राजस्थानमधील रामप्रकाश चौधरी, उत्तर विभागातून दुसरे उमेदवार रमेश कुमार, मध्य विभागात मध्य प्रदेशचे रघुवीर सिंग रघुवंशी तर दक्षिण विभागात कर्नाटक राज्यातील सिद्धाप्पा होट्टी विजयी झाले.

बिनविरोध संचालक असे
बिजेंदर सिंग, डॉ. चंद्रपाल सिंग यादव, मोहन कुंडारिया, अशोक ठाकूर, आंध्र प्रदेश सहकारी विपणन महासंघाचे शेखर गेड्डाम, छत्तीसगड महासंघाचे दीपक सोनी, गुजरात महासंघाचे जेठाभाई भारवाड, हरियाना महासंघाचे जे. गणेशा, कर्नाटक महासंघाचे गुरुनाथ रेड्डी, मध्य प्रदेश महासंघाचे अलोक कुमार सिंग, पंजाब महासंघाचे तरलोक सिंग, राजस्थान महासंघाचे सुशांत पंत, तेलंगणा महासंघाचे गंगा रेड्डी व उत्तर प्रदेश सहकारी महासंघाचे राकेश गुप्ता यांची बिनविरोध वर्णी लागली होती.


‘नाफेड’च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमाल खरेदी पारदर्शकता येण्यासह नवीन धोरण हाती घेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
- केदा आहेर, नवनिर्वाचित संचालक, नाफेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत ६ निर्णय; अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचनासाठी मंजुरी

Unseasonal Rain: राज्यात ३ दिवस गारपीटीचा अंदाज; पुढील ४ दिवस वादळी पावसासाठी पोषक हवामान

Agriculture Management: पिकातील अवशेषांचे व्यवस्थापन

Water Scarcity: काही शिवारांत पाणीटंचाईची स्थिती

World Happiness Report 2026: आनंदी समाज हाच खरा विकास

SCROLL FOR NEXT