Drought condition  Agrowon
ॲग्रो विशेष

Drought condition : दुष्काळ याद्यांतील घोळाने शेतकरी संतप्त ; जतच्या तहसीलदाराची फोडली गाडी

Water Crisis : राज्य शासनाने दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली. त्यातून जत तालुक्याला वगळल्याने शेतकऱ्याने तहसीलदारांची गाडी फोडली.

Swapnil Shinde

Sangli News : राज्य शासनाने राज्यातील ४० दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली. त्यात सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळी जत तालुक्याला वगळण्यात आले आहे. त्याबद्दल संताप व्यक्त करत प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जत तहसीलदारांची गाडी फोडली. बुधवारी (ता. १) तहसीलदार कार्यालयाच्या आवारात हा प्रकार घडला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

सांगली जिल्ह्यात दहा तालुके आहेत. त्यापैकी शिराळा, मिरज, कडेगाव आणि खानापूर या तालुक्यांचा समावेश दुष्काळी म्हणून करण्यात आला. अत्यंत तीव्र दुष्काळी स्थिती असलेल्या जत, आटपाडी तालुक्यांसह तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यांचा यात समावेश नाही. जतचा समावेश व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींनीही आंदोलन केले होते. जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी या तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करावा, असा नव्याने प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल केला आहे. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

दरम्यान, शासनाने मध्यम दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केली. जिल्ह्यातील शिराळा, मिरज, कडेगाव, आणि खानापूर या तालुक्यांचा मध्यम दुष्काळी यामध्ये समावेश करण्यात आला आहे. दरम्यान जिल्ह्यातील जत, आटपाडी, तासगाव आणि कवठेमहांकाळ हे चार तालुके दुष्काळात समाविष्ट न झाल्याने शेतकऱ्यांच्या मधून तीव्र संताप होत असताना जत तालुक्यातील प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जत तहसीलदारांची गाडी फोडली.

वास्तविक जत, आटपाडी, तासगाव आणि कवठेमहांकाळ या चारही तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असतानाही दुष्काळी तालुक्यांमध्ये हे तालुके समाविष्ट का केले नाहीत, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. अत्यंत तीव्र दुष्काळी यामध्ये तालुके समाविष्ट केले नाहीत तर शेतकऱ्यांमधून उद्रेक होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT