Water Storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Jat Water Storage : जतमध्ये पाणीसाठ्यात १६ टक्क्यांनी वाढ

Water Stock : जत तालुक्यात जून महिन्याच्या मध्यावर २७ प्रकल्पांत ६५३.८२ म्हणजे २२ टक्के इतका पाणीसाठा होता. महिन्यात ८५.७ मिलिमीटर म्हणजे ९३ टक्के इतका पाऊस झाला.

Team Agrowon

Sangli News : जत तालुक्यात जून महिन्याच्या मध्यावर २७ प्रकल्पांत ६५३.८२ म्हणजे २२ टक्के इतका पाणीसाठा होता. महिन्यात ८५.७ मिलिमीटर म्हणजे ९३ टक्के इतका पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील मध्यम व लघू प्रकल्पांतील पाणीसाठा वाढला आहे. जुलै महिन्यात पाणीसाठा ३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. अर्थात, एका महिन्यात सुमारे १६ टक्क्यांनी पाणीसाठा वाढल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिसाला मिळाला आहे.

जत तालुक्यातील प्रकल्पांत एकूण पाणी साठवण क्षमता ३८२६.४७ दशलक्ष घनफूट इतकी असून त्यापैकी २९८७.२३ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपयुक्त आहे. गतवर्षी तालुक्यात कमी अधिक पाऊस झाल्याने प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते.

त्यामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने जानेवारी महिन्यापासून काही अंशी पाणीटंचाई भासू लागली होती. यामुळे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करून दुष्काळी भागातील शेतीची तहान भागवली होती.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यापासून वाढती उष्णतेमुळे प्रकल्पातील पाणीसाठा कमी होवू लागला. प्रत्यक्षात मार्च महिन्यात १० टक्क्यांनी पाणीसाठा कमी झाला. परंतु एप्रिल आणि मे महिन्यातही प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली होती. दरम्यान, मे महिन्यात तालुक्यात अवकाळी पाऊस झाला असला तरी, पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नसल्याचे चित्र होते.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मे महिन्याच्या मध्यापासून मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. जत तालुक्यातही पाऊस झाला. जत तालुक्याची जून महिन्याच्या पावसाची सरासरी ९२.२ मिलिमीटर इतकी आहे. जून महिन्यात ८५.७ मिलिमीटर म्हणजे ९३ टक्के पाऊस झाला. या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढला आहे.

जून महिन्याच्या मध्यावर ९६५.०६ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला होता. त्यापैकी ६५३.८२ दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा होता. जुलैच्या मध्यावर २७ प्रकल्पांत ११२१.१९ दशलक्ष घनफूट इतका म्हणजे ३८ टक्के पाणीसाठा झाला आहे. गत महिन्यापेक्षा जुलैमध्ये १६ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात वाढच

पूर्ण क्षमतेने भरलेले प्रकल्प - ८

कोरडे प्रकल्प - ६

मृतसाठे प्रकल्प - ६

जत तालुक्यातील उपयुक्त पाणीसाठा दृष्टिक्षेप (दशलक्ष घनफूट)

महिना पाणीसाठा टक्केवारी

१५ जून ६५३.८२ २२

२८ मे १७०.६१ ६

२९ एप्रिल १४३.०३ ५

१५ मार्च ५३०.२८ १८

८ फेब्रुवारी ८५१.९० २६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Corridor Maharashtra : ‘टायगर कॉरिडॉर’च्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

Weather Station : हवामान केंद्राची उंची दहा मीटर करा ः स्वाभिमानी शेतकरी संघटना

Crop Loan : पीककर्ज वाटपावर कर्जमाफीचे सावट

AI In Sugarcane : ऊस शेतीत ‘एआय’ वापरासाठी ‘केडीसीसी’कडे अर्ज करा

Lumpy Skin Disease : लम्पी स्कीन आजाराचा पशुधनात वाढता धोका

SCROLL FOR NEXT