Hunger Strike Agrowon
ॲग्रो विशेष

Manoj Jarange Hunger Strike : जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित

Hunger Strike Suspended : श्री. जरांगे यांनी १६ सप्टेंबरपासून सुरू केलेले आमरण उपोषण नवव्या दिवशी बुधवारी (ता. २५) सायंकाळी चार वाजता नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज, गावातील महिला यांच्या हस्ते पाणी घेऊन स्थगित केले.

Team Agrowon

Jalna News : ‘‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माझा गरीब मराठा आरक्षणाची वाट बघत आहे. आम्हाला राजकारणात जायचे नाही. आरक्षण देण्याची तुम्हाला संधी आहे. मराठ्यांच्या नादी लागून नुकसान करून घेऊ नका. आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षण द्या, आरक्षण नाही मिळाले तर तुमच्या निवडणुकीचे गणित बिघडविले जातील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

श्री. जरांगे यांनी १६ सप्टेंबरपासून सुरू केलेले आमरण उपोषण नवव्या दिवशी बुधवारी (ता. २५) सायंकाळी चार वाजता नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज, गावातील महिला यांच्या हस्ते पाणी घेऊन स्थगित केले. तशी घोषणा श्री. जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेमध्ये केली.

श्री. जरांगे पाटील म्हणाले, की सरकार मराठा समाजाला धोका देत आहे. समाजाने एक राहून लढा सुरू ठेवावा. गरीब, राजकीय, नोकरदार यासह सर्व मराठ्यांना आरक्षण मिळावे असे वाटते. मराठा आणि कुणबी एकच आहे. समाजाने शांतता राखावी, आरक्षण यांनी नाही दिले तर मग सत्तेत जाऊन घ्यावे लागेल. सध्या वाद न करता शांततेत आंदोलन करावे. सलाइन घेऊन पडून राहणे मला योग्य वाटत नाही.

मंगळवारी मध्यरात्री जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, पोलिस अधिकारी विशाल खांबे आदींनी भेट घेतली. न्यायालयाने देखील तब्येतीची काळजी घेण्यासाठी उपचार घेण्याचे सांगितले.

मी न्यायालयाचा, उपस्थित जनतेचा सन्मान करत रात्री तीन सलाइन घेतले. मला सलाइन लावल्यावर काही होणार नाही. पडून राहिलो तर समाजाच्या लोकांचे पाऊस, पाण्यामुळे हाल होतात हे बघवले जात नाही. फडणवीस साहेब आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. सगे सोयरे कायदा, गॅझेट लागू करा, सरसकट गुन्हे वापस घ्या, या पुढे नेत्यांच्या सभेला जायचे नाही. आचारसंहिता लागेपर्यंत सरकारने आरक्षण द्यावे, असे श्री. जरांगे पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Double Income : भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी; अखिलेश यादवांची शेतकरी प्रश्नांवरून टीका

Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले

Marathwada Water Project: मराठवाड्याचा पाणीप्रश्न ऐरणीवर

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Maratha Protest: मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार : जरांगे

SCROLL FOR NEXT