Jamin Vatap Update : शंभूराव नावाचा एक बागायतदार होता. त्याला रघू व नीरज अशी दोन मुले होती. रघू थोरला होता आणि घरचा कारभार तोच करत असे. नीरज धाकटा शिकलेला व नोकरी करणारा होता.
दोघा भावांमध्ये पटेनासे झाले आणि दोघांनी जमिनीत वाटण्या करण्याचा तगादा वडिलांच्या मागे लावला. शरीर थकत नाही तोपर्यंत मी वाटण्या करणार नाही असे शंभूरावचे म्हणणे होते.
शंभूराव म्हातारा झाल्यावर त्याने एकदाचे जमिनीचे वाटप करायचे ठरवले. जमिनीच्या वाटपासाठी दोन्ही मुलांना बोलावून वाटपासाठी दोन-चार बैठका झाल्या. शंभूरावच्या मनात रीतसर दोघांना समान व सारखे वाटप करायचा विचार होता.
कारभारीपणा करत असल्यामुळे थोरला रघूच्या मनात मात्र काहीतरी सबब सांगून थोडीफार जास्त जमीन वाटपात घ्यायचा विचार होता.
तर धाकटा नीरज हा शिकलेला असल्यामुळे आपण फसू नये म्हणून मिनिटामिनिटाला आपल्या वकील मित्राचा सल्ला घेत होता.
वाटप करताना कोणत्याही परिस्थितीत दोघा भावांपैकी कोणीही कच खाणार नाही व जास्त जमीन दुसऱ्या भावाला जाणार नाही, याची दक्षता दोन्ही भावांच्या बायका घेत होत्या.
प्रत्यक्ष शेतात राहत असल्यामुळे घर थोरल्या रघूला द्यावे व त्या बदल्यात धाकट्या नीरजला विहीर असलेली जमीन द्यावी, असा वडील शंभूरावचा विचार होता. त्यावर थोरला रघू म्हणाला, की आयुष्यभर आम्ही जुन्या घरात राहिलो. आता आमची इच्छा नवीन बंगला बांधायचा आहे.
त्यामुळे जुने घर घेतले, तर त्या बदल्यात मला दहा गुंठे जमीन जास्त दिली पाहिजे अशी त्याने मागणी केली. त्या विरोधात बागायत जमीन मिळूनसुद्धा विहिरीमध्ये दोन गुंठे व विहिरीच्या कडेने दोन गुंठे रान पडीक राहिल्यामुळे आपल्या वाट्याला जमीन कमी येते असे नीरजचे म्हणणे होते.
त्यानंतर आपल्या हिश्शाची जमिनीत दहा फुटांचा रस्ता रघूच्या जमिनीतून द्यावा असे नीरजचे म्हणणे होते. तर आहे त्या जमिनीत रस्ते पाडू नयेत व नीरजने पायवाटेचा वापर करावा असे रघूचे म्हणणे होते. जर रघू रस्ता देत नसला तर त्याने पिण्यासाठी व वापराच्या पाण्यासाठी नवीन विहीर काढावी. आपल्या हिश्शाला येणाऱ्या विहिरीतून पाणी घेण्याचा संबंध नाही, असे नीरजचे म्हणणे होते.
शेवटपर्यंत दोघांचे समाधान होईल असे न्यायाचे वाटप वडील शंभूराव करू शकले नाही. आयुष्यभर जमीन बागायत करण्यासाठी खस्ता खाल्लेल्या शंभूरावला दोन्ही मुलांचे समाधान होईल असे वाटप करता आले नाही. उतार वयात वडील एका भावाकडे आणि आई एका भावाकडे असे वाटप झाले तेव्हा सारे गावकरी हळहळले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.