Voter Registration  Agrowon
ॲग्रो विशेष

New Voter Registration : विधानसभा निवडणुकीनंतर वाढले ४५ हजार मतदार

Election Commission Maharashtra : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोदवड वगळता जिल्ह्यातील १८ पालिकांसाठी संभाव्य प्रभागांची हद्द तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात तब्बल ४५ हजार मतदारांची भर पडली आहे. यात महिला नवमतदारांच्या नोंदणीत वाढ झाल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली. ऑक्टोबर २०२४ मध्ये असलेले पुरूष स्त्री लिंग गुणोत्तराचे प्रमाण ९४७ वरून ९५४ झाले आहे.

जिल्ह्यात गेल्या तीन, चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोदवड वगळता जिल्ह्यातील १८ पालिकांसाठी संभाव्य प्रभागांची हद्द तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

गुगल मॅपवर प्रभागांचे नकाशे तयार झाल्यानंतर पालिका प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती, गण गट, नगरपरिषदांचा प्रभागनिहाय हद्द तपासणी पूर्ण झाल्यानंतर स्थानिक समितीकडून प्रारुप प्रभाग रचनेचा मसुदा तयार केला जाणार आहे.

जळगाव जिल्ह्यात १९ नगरपरिषद नगरपालिका आहेत. त्यातील १८ पालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. बोदवड नगरपंचायतीची कालावधी २०२६ मध्ये संपुष्टात येणार आहे, त्यानुसार बोदवड नगरपंचायत वगळता स्थानिक स्तरावर हरकती मागविण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

Voter Registration

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : पावसाने ७४४ गावांमधील सोळा हजार शेतकऱ्यांचे नुकसान

Bhumi Abhilekh Portal : पोर्टलवर ८३ गावांचे दर्शन दुर्लभ

MGNREGA Fund : ‘मनरेगा’च्या अंमलबजावणीत निधी उपलब्धतेचा अडसर

Fertilizer Buffer Stock : ‘बफर स्टॉक’मधून १३०२ टन युरिया खुला

Health Workers Issue : आरोग्य कर्मचाऱ्यांची आर्थिक घडी कोलमडली

SCROLL FOR NEXT