Jal Jeevan Mission  Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jeevan Scheme : ‘जलजीवन’च्या कामाची चौकशी करा

Rural Water Supply Scheme : कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेल्या जलजीवन योजनेची कामे पूर्ण झाली नाही. जेथे कामे झाली तेथे निकृष्ट कामे झाल्याने लोकांनी पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेल्या जलजीवन योजनेची कामे पूर्ण झाली नाही. जेथे कामे झाली तेथे निकृष्ट कामे झाल्याने लोकांनी पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे कर्जत-जामखेड तालुक्यातील सर्व गाव-वाडी-वस्तीतील जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांनी केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अॅड. अरुण जाधव यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, या कामाची चौकशी न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

जलजीवन मिशन ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी कर्जत-जामखेड तालुक्यामध्ये शासनाकडून कोट्यवधी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली होती. परंतु या योजनेचे काम चालू करताना जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकारी ठेकेदार, पुढारी यांच्या साखळी पद्धतीने हे काम अगदी निकृष्ट दर्जाचे व कागदावरती करण्यात आले आहे. ही योजना पूर्ण होऊन एक ते दीड वर्ष झाले, तरी देखील मोदी सरकारच्या घोषणेप्रमाणे हर घर, हर नळ याप्रमाणे तालुक्यातील कोणत्याच गावातील ग्रामस्थांच्या घरी नळ नाही.

नळाला पाणीही गेले नाही. यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. गरिबांच्या दारामध्ये पाणी पुरवण्यासाठी ही योजना राबवली होती. परंतु तसे न होता फक्त अधिकारी, ठेकेदार व नेत्यांच्या घशाला पाणी मिळण्यासाठी झाली आहे. ही योजना चालू असताना संबंधित गावातील गावकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता, उपअभियंता कनिष्ठ अभियंता व गटविकास अधिकारी यांच्याकडे अनेक वेळेस तोंडी व लेखी तक्रार देखील केलेल्या आहेत.

कारण ठेकेदार, अधिकारी व नेते यांची साखळी असल्याने त्यांनी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, तसेच गावकऱ्यांना कोणालाच विश्वासात न घेता ही योजना निकृष्ट दर्जाची पूर्ण केली आहे.

या योजनेची चौकशी केल्याशिवाय संबंधी ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येऊ नये, असे अनेक गावांतील गावकऱ्यांनी प्रशासनास लेखी पत्र दिले असताना देखील संबंधित अधिकाऱ्यांनी घाईगडबडीत ठेकेदारांचे संपूर्ण बिल अदा केले आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष योगेश साठे, ऋषिकेश गायकवाड सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT