Loksabha Election Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election Result 2024 : जनसंपर्क, निष्ठेमुळे जाधव विजयी; जानकरांचा आत्मविश्‍वास फोल

Loksabha Election Result 2024 Update : परभणी लोकसभा मतदार संघ निवडणुकीत शिवसेनेचे (उबाठा) संजय जाधव हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले.

Team Agrowon

Parbhani Loksabha Election 2024 News : परभणी लोकसभा मतदार संघ निवडणुकीत शिवसेनेचे (उबाठा) संजय जाधव हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले. यापूर्वीच्या (२०१४ व २०१९) निवडणुकीच्या तुलनेत यंदा (२०२४) जाधव यांना सर्वाधिक म्हणजे ६ लाख १ हजार ३४३ (४५.१७ टक्के) मते मिळाली.

तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना ४ लाख ६७ हजार २८२ मते (३५.१० टक्के) मिळाली. मागील दोन निवडणुकीच्या तुलनेत जाधव यांच्या मताधिक्यात मोठी वाढ झाली असून यंदा जानकारांपेक्षा १ लाख ३४ हजार ६१ एवढ्या मताधिक्यांने ते विजयी झाले.

निवडणुकीत परभणी मतदार संघात विविध पक्ष तसेच अपक्ष मिळून एकूण ३४ उमेदवार होते. जाधव व जानकर यांच्यात थेट लढत झाली. वंचित बहुजन आघाडीचे पंजाब डख यांना ९५ हजार ९६७ मते (७.२१ टक्के) मते मिळाली.

अन्य उमेदवारांना १ हजार २४६ ते १५ हजार ३९५ दरम्यान मते मिळाली. विकासाच्या मुद्द्यावरून जाधव यांना घेरण्यात विरोधक असफल ठरले. केवळ ओबीसींच्या मतांवर आपण विजयी होऊ हा जानकर यांचा आत्मविश्वास फोल ठरला.

भारतीय जनता पक्षाने जानकरांच्या मागे मोठे पाठबळ उभे केले. परंतु मतदार संघाबाहेरचा उमदेवार लादल्यामुळे भाजप तसेच मित्र पक्षांतील इच्छुक नाराज झाले. गंगाखेड वगळता अन्य मतदार संघांत रासपच्या कार्यकर्त्यांचे जाळे नव्हते. जाधव यांचा गावागावांतील दांडगा जनसंपर्क तसेच शिवसेनेतील फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील निष्ठा जनतेला भावली.

भाजपच्या विरोधातील एकगठ्ठा मते जाधवांना मिळविण्यात यश आले. चुरशीच्या लढतीचे अंदाज लावले जात होते. परंतु टपाली मतदानासह पहिल्या फेरीपासून जाधवांनी आघाडी कायम राखली. जानकरांना शेवटच्या काही फेऱ्यांत मिळालेेले मताधिक्य पराभव टाळण्यासाठी अपुरे ठरले.

परभणी लोकसभा निवडणुक २०२४ तुलनात्मक मतदान स्थिती

विधानसभा मतदारसंघ संजय जाधव महादेव जानकर मताधिक्य

जिंतूर १००५०० ८७८५५ १२६४५

परभणी १०८३७४ ६५९७४ ४२४००

गंगाखेड १०१११७ १०७८२८ ६७११

पाथरी १११९०६ ८२७३५ २९१७१

परतूर ८५०६० ५९७१६ २५३४४

घनसावंगी ८९९१४ ५९६५६ ३०२५८

टपाली ४४७१ ३५१८ ९५४

२०१४ लोकसभेची स्थिती

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव (प्राप्त मते ५७८४५५) यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विजय भांबळे (प्राप्त मते ४५१३००) यांचा १ लाख २७ हजारांवर मतांनी पराभव केला होता. २०१९ निवडणुकीत जाधव (प्राप्त मते ५३८९४१) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर (प्राप्त मते ४९६७४२) यांचा ४२ हजारांवर मतांनी मात केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT