VNMKV  Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : माथा ते पायथा जलसंधारणातून दुष्काळाच्या झळा कमी करणे शक्य

Water Conservation : जलसंधारणाच्या माथा ते पायथा उपचारातूनच दुष्काळाच्या झळा कमी करता येतील, असे प्रतिपादन मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण यांनी केले.

Team Agrowon

Parbhani News : राज्यातील सिंचन क्षेत्रात कितीही प्रयत्न केले तर जास्तीजास्त २५ ते २८ टक्के पर्यंत वाढ होऊ शकते. सिंचन क्षेत्र वाढीसाठी पाणलोटाची कामे झाली पाहिजे. जलसंधारणाच्या माथा ते पायथा उपचारातूनच दुष्काळाच्या झळा कमी करता येतील, असे प्रतिपादन मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (ता. १८) कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभाग यांच्या तर्फे आयोजित खरीप पीक परिसंवाद व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणी होते.

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, बिजोत्पादन संचालक डॉ. देवराव देवसरकर,

विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, आत्माचे संचालक दशरथ तांभाळे, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे (छत्रपती संभाजीनगर), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल गवळी, एमसीएईआरचे संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर,वॉव गो. ग्रीन. डॉ. शंकर गोयंका आदींची उपस्थिती होती.

चव्हाण म्हणाले, की जिरायती क्षेत्रात तग धरुन राहणारे पिकांचे वाण विकसित करण्यावर कृषी विद्यापीठांना भर द्यावा लागेल. दहा वर्षे झालेले पिकांचे वाण बदलेले पाहिजेत. पाणलोटाचे उपचार, गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार, छोटे प्रकल्प यामुळे सिंचनात वाढ होऊ शकते. तलवातील गाळ काढल्यामुळे साठवण क्षमता वाढत आहे. शेतात गाळ टाकल्यामुळे सुपीकता वाढत आहे. डॉ. गडाख म्हणाले, की उत्पादकता दुप्पट,उत्पादन खर्च ५० टक्केनी कमी, स्वतःची विक्री व्यवस्था यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते.

५० हजार क्विंटल बिजोत्पादनाचे उद्दिष्ट...

कुलगुरू डॉ. इंद्र मणी म्हणाले, की गतवर्षी २ हजार एकर पडीक जमीन विहितीखाली आणल्यामुळे बिजोत्पादनात मोठी वाढ झाली आहे. येत्या काळात बिजोत्पादन क्षेत्रात वाढ करुन ५ हजार क्विंटल पैदासकार बियाण्यासह एकूण ५० हजार क्विंटल बिजोत्पादनाचे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Honoure: कृषी योजनांतून यशस्वी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा परिषदेत गौरव

Late Sowing Tips: उशिरा पेरणी करताय? पिके आणि वाणांची निवड काळजीपूर्वक करा!

Groundnut Cultivation: खानदेशात भुईमूग लागवड स्थिर

Soil Fertility: सातारा जिल्ह्यातील ४६७ गावांचे सुपीकता चित्र स्पष्ट

Rainfall Deficit: जूनमध्ये पावसाची ६० टक्के तूट

SCROLL FOR NEXT