Seed Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Indigenous Seeds Conservation: देशी बियाण्यांचे संवर्धन करणे गरजेचे

Seed Farming: देशी बियाण्यांचे संवर्धन हे कृषी संस्कृती आणि आहार साखळी टिकवण्यासाठी महत्त्वाचे आहे. ‘बीजकथा’ उपक्रमाद्वारे पारंपरिक शेती पद्धती आणि जैवविविधतेच्या जतनावर भर देण्यात आला आहे.

गणेश कोरे

Pune News: औद्योगिकीकरणामुळे आपण पारंपरिक कृषी संस्कृती आणि ज्ञानापासून दुरावत चाललो आहे. याचा परिणाम आहारावर झाला आहे. येणारी पिढी टिकवायची असेल तर कृषीच्या पारंपरिक ज्ञान संस्कृती आणि देशी बियाण्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे मत ‘बाएफ’चे (भारतीय कृषी औद्योगिक संस्था) प्रकल्प संचालक संजय पाटील यांनी व्यक्त केले.

गोएथ इन्स्टिट्यूट मॅक्सम्युलर भवन यांच्या वतीने आणि बीज संवर्धक अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘बीजकथा’ कार्यक्रमाचा प्रारंभ शुक्रवारी (ता. २८) देशी बियाणे संवर्धकांच्या मनोगताने झाला. या वेळी बाळू घोडे (कळसूबाई) ममता भांगरे (अकोले) भिका ब्राह्मणे (तोरणाळ) योगिनी पाटील (चंद्रपूर) उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे कृषी जैवविविधता धोक्यात येत आहे. अशातही ग्रामीण भागांत स्थानिकांना पारंपरिक ज्ञानातून जैवविविधता संवर्धनाचे काम केले. संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या सुमारे साडेचार हजार ओव्यांमध्ये माती, बियाणे आणि शेती संस्कृतीचे महत्त्व सांगितले आहे.

हे पोषणमूल्य जोपासण्यासाठी सणांचे देखील संवर्धन होणे गरजेचे आहे. ममता भांगरे म्हणाल्या, की महिलांच्या आहारात नाचणीसत्व सारखे पोषणमूल्य महत्त्वाचे आहे. मात्र दिवसेंदिवस महिला पारंपरिक पौष्टिक आहारातून दुरावत चालल्या आहे. हे टाळण्यासाठी देशी बियाण्यांचा संवर्धन व्हायला पाहिजे.

योगिनी पाटील म्हणाल्या, की ग्रामीण आणि शहरी संवाद हरवत चालला आहे. पारंपरिक ज्ञान खेड्यातच आहे. खेड्यातील ज्येष्ठ नागरिक शेतकऱ्यांशी संवाद साधला तर पाण्यापासून, भाकरीपर्यंत विविध रोमांचकारी ज्ञान मिळते त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. या वेळी बाळू घोडे आणि भिका ब्राह्मणे यांनी देशी बियाणे संवर्धनातील अनुभव सांगितले. हा कार्यक्रम ९ तारखेपर्यंत खुला असणार आहे. यात चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण, कविता, नृत्य आणि बियाण्यांचे प्रदर्शन, अशा विविध गोष्टींचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT