AI in Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

AI In Agriculture: ऊस शेतीत एआयच्या वापरासाठी आयएसएमएचा एडीटीसोबत करार

Smart Farming: ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा (एआय) वापर यशस्वी ठरत आहे. त्यामुळे साखर उताऱ्यासह शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी विविध संस्थांकडून पुढाकार घेतला जात आहे.

Dhananjay Sanap

AI Sugarcane: ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा (एआय) वापर यशस्वी ठरत आहे. त्यामुळे साखर उताऱ्यासह शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी विविध संस्थांकडून पुढाकार घेतला जात आहे. ऊस शेतीसाठी इंडियन शुगर अॅण्ड बायो मॅन्युफ्र्क्चर असोशिएशन (आयएसएमए) कृत्रिम बुद्धिमत्ता-मशीन लर्निंगवर आधारित राष्ट्रीय नेटवर्क उपक्रमाची सुरुवात केली आहे.

आयएसएमएने मंगळवारी (ता.५) बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टसोबत (एडीटी) भागीदारीत या उपक्रमाची घोषणा केली आहे. त्यासाठी इस्माने एडीटी बारामती व पुण्यातील मॅप माय क्रॉप यांच्याशी सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमामध्ये उसाची उत्पादकता, गुणवत्ता आणि शाश्वततेत वाढ यावर भर देण्यात येणार आहे.  

ऊस शेतीत एआयच्या वापराने उत्पादनातील वाढ व संसाधनांचा प्रभावी वापर करता येणार आहेच. परंतु त्यामुळे केवळ साखरेच्या उताऱ्यात सुधारणा होणार नसून थेट शेतकऱ्यांचा नफा देखील वाढेल, असे आयएसएमएने निवेदनात म्हटले. एडीटीने २०२४ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्टच्या मदतीने ऊस शेतीत एआयचा वापर करून उत्पादकता वाढवली आहे.

या उपक्रमात ऊस पीक उत्पादनात ४० टक्के वाढ झाली असून मजुरी खर्चात ३५ टक्के घट, पाणी वापरात ३० टक्के बचत आणि ऊस तोडणीच्या कार्यक्षमतेत ३५ टक्क्यांनी सुधारणा झाल्याचा दावा इस्माने केला. तसेच उत्पादन खर्चात लक्षणीय घट झाली असून काटेकोर शेतीतून हरितगृह वायू उत्सर्जनातही कपात झाल्याचा दावाही आयएसएमएने केला आहे.

एडीटीने महाराष्ट्रातील एक ह्जाराहून अधिक शेतकऱ्यांना एआय आधारित उपाययोजना, मशीन लर्निंग आणि कंप्युटर व्हिजन टूल्स वापरण्यास सक्षम केलं आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याचा दावा इस्माने केला आहे.

उसाची उत्पादकतेसह साखरा उतारा कमी झाला आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रति हेक्टर उसाचे सरासरी उत्पादन १०० टनांहून अधिक आणि साखर उतारा ११ टक्क्यांवर नेण्याची गरज असल्याचे आयएसएमएने स्पष्ट केले आहे. इस्माने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ऊस संशोधन संस्थेसोबत उच्च उत्पादकता देणाऱ्या वाण विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे.

एआय तंत्रज्ञान आधारित नेटवर्क प्रणाली शेतकऱ्यांना अधिक चांगले निर्णय घेण्यास, कमी संसाधनांचा वापर करून जास्त नफा मिळवण्यासाठी मदत करेल. शेतकऱ्यांनी त्याचा लवकर स्वीकार करावा यासाठी क्षेत्रीय प्रात्यक्षिक व विविध सत्र आयोजित करण्यात येणार आहेत.
- दीपक बल्लानी महासंचालक, आयएसएमए

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Sale Fraud: ‘पॉस’मधील गैरप्रकारांकडे सहा वर्षांपासून दुर्लक्ष

Illegal Raisin Import: बेकायदा बेदाणा आयातदारांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा

Sugar Industry: साखर निर्यात, इथेनॉलबाबत केंद्राने धोरण स्पष्ट करावे

Drip Irrigation Subsidy: राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ठिबकसाठी अनुदान

Soybean Seeds Sale: सोयाबीन बियाण्याची ३२ हजार क्विंटलवर विक्री

SCROLL FOR NEXT