Water Scarcity Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : सांगली जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ

Water Storage : गेल्या पंधरा दिवसांत ८ टक्क्यांनी म्हणजे ६३९ दशलक्ष घनफुटाने पाणीसाठा घटला आहे. जत तालुक्यात सर्वांत कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे आवर्तन सुरू आहे. मात्र, पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्याऐवजी घटू लागला असल्याचे चित्र आहे. गेल्या पंधरा दिवसांत ८ टक्क्यांनी म्हणजे ६३९ दशलक्ष घनफुटाने पाणीसाठा घटला आहे. जत तालुक्यात सर्वांत कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यात पाणीटंचाईची झळ वाढू लागली असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात मध्यम व लघू प्रकल्पांची संख्या ८३ इतकी आहे. मार्च महिन्यात या प्रकल्पात २९०८ दशलक्ष घनफूट म्हणजे ३७ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. त्यामध्ये सात प्रकल्पांत मृतपाणी साठा होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढू लागली आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ८३ प्रकल्पांत २२६९ दशलक्ष घनफूट म्हणजे २९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अर्थात गेल्या पंधरा दिवसांत ६३९ दशलक्ष घनफूट म्हणजे ८ टक्क्यांनी पाणीसाठा कमी झाला आहे. खानापूर, कडेगाव, आणि आटपाडी तालुक्यांत ४० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. तर तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांत तीस टक्के इतका पाणीसाठा आहे.

मात्र, जत तालुक्यातील २७ प्रकल्पांत ६२९ दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून त्यापैकी २९१ दशलक्ष घनफूट म्हणजे १० टक्के इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे जत तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ८३ प्रकल्पांपैकी १३ प्रकल्पांत मृत पाणीसाठा, तर ३ प्रकल्प कोरडे आहेत. २३ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा पाणीसाठा तर ६ प्रकल्पात ७५ टक्के इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे आवर्तन सुरू आहे. या आवर्तनातून लाभ क्षेत्रातील प्रकल्प भरून देण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. मात्र, तिन्ही योजनांच्या आवर्तनातून या लाभक्षेत्रातील प्रकल्पात पाणी सोडण्यात आले नाही. प्रकल्पात पाणी भरून देण्याचे नियोजन कोलमडले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा केला जाणार का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

तालुकानिहाय प्रकल्पातील पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)

तालुका प्रकल्पांची संख्या उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी

तासगाव ७ १८७.८३ ३३

खानापूर ८ २४९.७० ४६

कडेगाव ७ २७३.८१ ४३

शिराळा ५ ३४४.३९ ३९

आटपाडी १३ ५१६.५८ ४५

जत २७ २९१.५० १०

कवठेमहांकाळ ११ ३२५.५५ ३९

मिरज ३ ६९.६२ ५८

वाळवा २ १०.१७ २१

एकूण ८३ २२६९.१६ २९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT