Panchganga River Agrowon
ॲग्रो विशेष

Panchganga River : पंचगंगा, भोगावती नद्यांतून पाणी उपसाबंदी

Team Agrowon

Kolhapur News : पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरांवरील भागांत उन्हाळी हंगाममधील कालावधीत शेतीसाठी पाणीउपसा (Agriculture Irrigation) करणाऱ्या यंत्रांवर बंदीचे आदेश पाटबंधारे विभागाचे (उत्तर) कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिले.

राधानगरी धरणापासून ते शिंगणापूर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या भोगावती नदीवरील दोन्ही तीरांवरील तुळशी धरणापासून ते बीड बंधाऱ्यापर्यंतचा भाग, कुंभी धरणापासून भोगावती नदी संगमापर्यंतचा भाग, कासारी धरणापासून प्रयाग चिखली संगमापर्यंतचा भाग, नमूद केलेल्या नदीवरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढे व नाल्यांवरील पाणी फुगीच्या दोन्ही तीरावरील भागात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपसायंत्रांवर १८ ते २० एप्रिल २०२३ असे तीन दिवस बंदी करण्यात येत आहे.

पंचगंगा नदीवर शिंगणापूर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापासून ते शिरोळ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या दोन्ही तीरांवरील भागांमध्ये शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपसायंत्रांसाठी २१ ते २३ एप्रिल २०२३ असे तीन दिवस बंदी करण्यात येत आहे.

उपसाबंदी कालावधीत बेकायदा उपसा आढळल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करून परवानाधारकाचा परवाना एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही, असेही बांदिवडेकर यांनी आदेशात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT