Ghodganga Sugar Factory  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory Mismanagement : घोडगंगा कारखान्याच्या गैरकारभार चौकशी करा

Ghodganga Sugar Factory Issue : कारखाना चालू करण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे काय झाले. हा प्रश्न अनुत्तरित आहे. आज कारखान्यावर कर्ज किती आहे, याविषयी कोणतीही अधिकृत माहिती कारखाना प्रशासनाकडून दिली जात नाही.

Team Agrowon

Pune News : गेल्या गळीत हंगामासाठी (२०२३-२४) बँकेकडून कर्ज घेतले पण तरीही घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू झाला नाही. येणाऱ्या गळीत हंगामात सुद्धा कारखाना चालू करण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल केली जात नाही.

म्हणजे कारखाना चालू करण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे काय झाले. हा प्रश्न अनुत्तरित आहे. आज कारखान्यावर कर्ज किती आहे, याविषयी कोणतीही अधिकृत माहिती कारखाना प्रशासनाकडून दिली जात नाही.

त्यामुळे या कारखान्याच्या गैरकारभाराची चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष राजेंद्र ढमढेरे यांनी साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे केली आहे.

साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की घोडगंगा साखर कारखाना हा शिरूर तालुक्यातील अर्थकारणाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. वीस हजार सभासदांनी पै-पै जमा करून तो उभारला आहे.

सुरुवातीच्या काळात काही हंगामात कारखान्याने उच्चांकी दर देऊन नावलौकिक मिळविला आहे. कर्ज परतफेड बाजूलाच पण कर्ज रकमेचे व्याज भरण्याची सुद्धा कारखान्यांची आर्थिक परिस्थिती नाही. कामगारांचे अनेक महिन्यांपासून पगार नाहीत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत एफआरपी सुद्धा दिलेली नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना मिळू शकते खुशखबर; पीएम किसान योजनेची रक्कम ६ हजार वरून ९ हजार होईल?

Irrigation Projects Storage: धुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांत साचला गाळ

Winter Poultry Care: थंडीमध्ये आहाराचे नियोजन करुन घ्या कोंबड्यांची काळजी

Onion Harvest: लेट खरीप कांदा काढणी सुरूच

Sugarcane Farming: सुरु ऊस लागवडीचे तंत्र

SCROLL FOR NEXT