Education Scholarship Agrowon
ॲग्रो विशेष

Education Scholarship : ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती

Sakal India Foundation : ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यात येते. फाउंडेशनचे हे ६५ वे वर्ष आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांपासून एक लाख रुपयांची बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली जाते.

Team Agrowon

Pune News : ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यात येते. फाउंडेशनचे हे ६५ वे वर्ष आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांपासून एक लाख रुपयांची बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली जाते. त्याप्रमाणे भारतात पीएच.डी. करण्यासाठी किंवा परदेशी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये अशा ५० शिष्यवृत्त्या देण्यात येणार आहेत.

ज्या भारतीय पदवीधारक विद्यार्थ्यांना भारताबाहेरील विद्यापीठांकडून किंवा संशोधन संस्थेकडून किमान एक वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी (२०२४-२५) प्रवेश दिल्याबद्दलचे लेखी पत्र प्राप्त झाले असेल किंवा जे पदवीधर भारतातील विद्यापीठ तसेच राष्ट्रीय संशोधन संस्थेमध्ये पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्याबद्दलचे २०२२ किंवा त्या पूर्वीचे विद्यापीठाचे/ राष्ट्रीय संशोधन संस्थेचे लेखी पत्र प्राप्त झाले असेल, फक्त असेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता पात्र समजले जातील. बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीची रक्कम प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परतफेड २ वर्षात किंवा त्याआधी करणे बंधनकारक आहे.

वृत्तपत्र व्यवसायाचे पदव्युत्तर किंवा पीएच.डी.चे शिक्षण घेणाऱ्या तसेच वरील पात्रता अट पूर्ण करणाऱ्या शिष्यवृत्तीकरिता निवड झालेल्या विद्यार्थ्यास १०,००० रुपये इतकी रक्कम परतफेड न करण्याच्या अटीवर मंजूर केली जाईल.

असे सर्व पात्र विद्यार्थी फाउंडेशनच्या खालील वेबसाइट वरून ऑनलाइन अर्ज भरू शकतात. वेबसाइटवर शिष्यवृत्तीचे अर्ज २५ जून २०२४ पर्यंत कालावधीत उपलब्ध आहेत.

पोलिसांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने कै. लक्ष्मण विष्णू केळकर आणि कै. उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने पोलिसांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी देखील शिष्यवृत्ती सुरू केली आहे.

बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीसाठी काही जागा या मुलांसाठी राखीव आहेत. ज्यांना परदेशातील विद्यापीठातील प्रवेश पत्र प्राप्त झाले आहे, अशा विद्यार्थ्यांनी ‘केळकर शिष्यवृत्तीसाठी’ अर्ज करावा, असे आवाहन ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे करण्यात आले आहे.

वेबसाइट ः www.sakalindiafoundation.com

संपर्क : ०२०- ६६०३५९३५

ई-मेल : contactus@sakalindiafoundation.org

sakalindiafoundation@esakal.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Project Authority: जलसंधारण कामांच्या मान्यतेचे अधिकार ‘कृषी’कडून काढले

NBPGR and Agricultural University MOU : वनामकृवि, ‘राष्ट्रीय वनस्पती आनुवंशिक संसाधने’ यांच्यात करार

Caste Certificate Deadline: जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिने मुदतवाढ

Onion Payment Delay: ‘एनसीसीएफ,’ ‘नाफेड’कडून मिळेनात कांद्याचे पैसे

River Pollution: नद्या प्रदूषणमुक्तीसाठी पाण्यावर प्रक्रिया करू

SCROLL FOR NEXT