Crops Agrowon
ॲग्रो विशेष

Intercropping Method : आंतरपिकांना बहर

Intercrop Farming : तरुण शेतकऱ्यांनी मार्ग काढत आंतरपिकाचा मार्ग निवडला आहे. कमी पाण्यातून जास्त उत्पादनाच्या बागायतीचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी भेट देत आहेत.

Team Agrowon

प्रसाद जोशी, वसई

पालघरमधील अनेक तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करण्याची वेळ येते. अशातच अनेक ठिकाणी शेतीसाठी पाणीसाठा कमी असल्याने नागरिक अन्य व्यवसायाकडे वळत आहेत. मात्र, या संकटातून तरुण शेतकऱ्यांनी मार्ग काढत आंतरपिकाचा मार्ग निवडला आहे. कमी पाण्यातून जास्त उत्पादनाच्या बागायतीचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी भेट देत आहेत, हे विशेष म्हणावे लागेल.

पालघर जिल्ह्यात बागायतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मात्र नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मेहनत आणि पैसे वाया जातात. त्यामुळे अनेक जण शेतीकडे वळत नाहीत, तर रोजगार पसंत करतात, मात्र बेलवाडी येथे एकाच ठिकाणी अनेक पिकांची लागवड पाहून ‘चला शेतीकडे वळूया’ असे पुढच्या पिढीला नक्की वाटेल, अशी बागायत फुलवली आहे.

बोईसरचे आमदार राजेश पाटील, त्यांचे भाऊ श्यामा पाटील, नाना पाटील आणि संदीप पाटील यांनी महामार्गावरील बेलवाडी येथील जमिनीवर चाफ्याची २५० झाडे चार महिन्यांपूर्वी लावली. त्यातच विविध आंतरपीक घेतले आहे. वांगी, टोमॅटो, गवार, दुधी, भोपळा, भेंडी यांची लागवड केली असून भाजीपाला मोठ्या प्रमाणात मिळत आहे. हा भाजीपाला भाजी मंडईत विक्रीसाठी नेला जातो. पाणीपुरवठ्याची योग्य काळजी घेत पिकांची वाढ होण्यासाठी सतत लक्ष ठेवत आहेत, असे श्यामा पाटील आणि नाना पाटील यांनी सांगितले.

एकाच जमिनीवर अनेक पिके कशी घेता येतील, याचा धडा बेलवाडी येथील शेतकरी कुटुंबाने दिला आहे. त्यामुळे अन्य अल्प व मोठ्या भूधारकांना प्रोत्साहन मिळू लागले आहे.

ठिबक सिंचन पद्धतीचा वापर लाभदायक

फूल, भाजीपाला बागायतीला मुबलक पाणी मिळावे, यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. विहिरीतून हे पाणी थेट बागायतीला दिले जाते. खत, पिकांची निगा राखणे, रोगांचा प्रादुर्भाव निर्माण होऊ नये, यासाठी चार भाऊ देखभाल करत आहेत.

जमिनीचा योग्यरीत्या वापर केल्यास एकाच शेतात अनेक पिकांची लागवड केली जाऊ शकते. त्यातून जोडव्यवसायाला चालना मिळते व उत्पन्नात भर होते. त्यासाठी शेतकऱ्यांनी आंतरपीक घेण्याकडे वाटचाल केली पाहिजे.
राजेश पाटील, आमदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

Poultry Processing By Products: कुक्कुट प्रक्रिया उद्योगातील उप-उत्पादनांपासून मूल्यवर्धन

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

SCROLL FOR NEXT