Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University Vice Chancellor Dr. Sharad Gadakh Agrowon
ॲग्रो विशेष

Dr. Sharad Gadakh : बौद्धिक संपदेला व्यावसायिकतेची किनार गरजेची : कुलगुरू गडाख

Agriculture Technology : विवेकपूर्ण नीतिमत्ता आणि अनन्य साधारण बुद्धी कौशल्यातूनच नवनवीन शोध व मानव प्रजातीच्या विकासासाठी पूरक असे तंत्रज्ञान विकसित झाल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी प्रतिपादन केले.

Team Agrowon

Akola News : ऐतिहासिक काळापासून बुद्धिमत्ता आणि कलाक्षेत्राचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित झाले आहे. काळाच्या ओघात मानव प्रजातीचे कल्याण व सामाजिक प्रगती साधण्याच्या हेतूने सर्जनशील कर्तृत्व, विवेकपूर्ण नीतिमत्ता आणि अनन्य साधारण बुद्धी कौशल्यातूनच नवनवीन शोध व मानव प्रजातीच्या विकासासाठी पूरक असे तंत्रज्ञान विकसित झाल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी प्रतिपादन केले.

विद्यापीठाअंतर्गत शास्त्रज्ञ, तांत्रिक कर्मचारी व आचार्य पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या बौद्धिक संपदा अधिकार कक्ष आणि जलद मार्ग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पर्धात्मक युगातील बौद्धिक संपदा अधिकार: कल्पना शक्तीतून व्यावसायिकतेकडे’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. कुलगुरू डॉ. गडाख हे अध्यक्ष म्हणून या वेळी बोलत होते.

बौद्धिक संपदा अधिकाराचे कृषी संशोधनातील महत्त्व विषद करून नोंदणी व मंजुरीसाठी शिफारस करावयाचे पेटंट हे निवडक स्वरूपाचे, गुणवत्तापूर्ण व वापरकर्त्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असण्यावर भर देत त्यामध्ये व्यावसायिकतेच्या दृष्टीने वाव असावा, असे प्रतिपादनही त्यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर संशोधन संचालक तथा विद्यापीठाच्या बौद्धिक संपदा अधिकार कक्षाचे अध्यक्ष डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांच्यासह इतर उपस्थित होते. डॉ. खर्चे यांनी या कार्यशाळेमुळे कृषी शास्त्रज्ञांमध्ये जनजागृती होत पेटंट संदर्भातील अनिश्चितता व संभ्रम दूर होऊन शिफारशीच्या कार्यास उपयुक्त चालना मिळेल असा आशावाद व्यक्त केला.

पेटंट तज्ज्ञ व प्रशिक्षक सहस्ररश्मी पुंड यांनी पेटंट संबंधी एकूणच जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील विस्तृत घडामोडींचा आढावा मांडला. प्रास्ताविक कुलगुरूंचे तांत्रिक सचिव तथा बौद्धिक संपदा कक्षाचे सचिव प्रा. डॉ. नितीन कोष्टी यांनी केले.

बौद्धिक संपदा अधिकाराअंतर्गत आयोजित एकूण तीन तांत्रिक सत्रांपैकी पहिल्या सत्रामध्ये बौद्धिक संपदा अधिकाराचे प्रकार आणि प्रकरणाच्या अध्ययनाचे फायदे, दुसऱ्या सत्रामध्ये बौद्धिक संपदा अधिकाराची प्रक्रिया आणि तिसऱ्या सत्रामध्ये पेटंटचा मसुदा तयार करणे, त्याच्या व्याप्तीचे मजबुतीकरण आणि दावा सूत्रीकरण या महत्त्वपूर्ण विषयांसोबतच शंका समाधानासाठी प्रश्नोत्तरांचा समावेश करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. सचिन शिंदे यांनी केले. डॉ. मृदुलता देशमुख यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT