Custard Apple  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Scheme: सीताफळासाठी विमा योजना

Custard Apple Insurance: सीताफळ उत्पादकांसाठी हवामानाधारित विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत पावसाचा खंड किंवा अतिवृष्टी यांसारख्या हवामान धोक्यांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना थेट भरपाई देण्यात येणार आहे.

विनयकुमार आवटे

विनयकुमार आवटे

मृग बहरामध्ये सीताफळासाठी ही योजना अधिसूचित जिल्हा, अधिसूचित तालुका, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते. सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रात नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. सीताफळ पिकास खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) खालील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल. सीताफळ बाग तीन वर्ष पूर्ण झालेल्या उत्पादनक्षम बागेस विमा संरक्षण राहील.

विमा संरक्षण रक्कम प्रती हेक्टर ः ७०,००० रुपये

भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक ः ३१ जुलै २०२५

शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता ः ३,५०० रुपये प्रती हेक्टर

या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याचा ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आवश्यक आहे.

या योजनेत सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात. पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.

बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करुन सहभाग घेवू शकतात. त्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जीओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पासबुकवरील बँक खात्याबाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

हवामान धोके व कालावधी प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति / हेक्टर)

पावसाचा खंड ः १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये सलग १५ दिवसांचा पावसाचा खंड राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम १२,६०० रुपये देय होईल. या कालावधीमध्ये सलग २० दिवसांचा पावसाचा खंड राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम २१,००० रुपये देय होईल. या कालावधीमध्ये सलग २५ किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचा पावसाचा खंड राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम ४२,००० रुपये देय होईल. (कमाल नुकसान भरपाई रक्कम ४२,००० रुपये)

जास्त पाऊस ः १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीमध्ये १ दिवस ४० मि.मी. पाऊस झाल्यास रक्कम ११,२०० रुपये नुकसान भरपाई देय होईल. या कालावधीमध्ये सलग २ दिवस प्रतिदिन ४० मि.मी. पाऊस झाल्यास रक्कम २८,००० रुपये नुकसान भरपाई देय होईल.(कमाल नुकसान भरपाई रक्कम २८,००० रुपये)

या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी फळपीक लागवड केलेली नसताना किंवा उत्पादन योग्य फळपीक नसताना, दुसऱ्याच्या जमिनीवर किंवा शासनाच्या जमिनीवर, अकृषक जमिनीवर विमा काढून विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्यांचे विरुद्ध कडक कारवाई होऊ शकते. यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनीच योजनेत सहभाग घ्यावा.

शेतकऱ्यांनी फक्त स्वतःच्या जमिनीवर विमा घ्यावा.

शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी बंधनकारक आहे. ई-पीक पाहणी आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज केव्हाही रद्द होऊ शकतो. एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक अधिसूचित फळपिके असल्यास तो या सर्व पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो.

या योजनेत ‍प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागासाठी एका फळपिकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे (०.१० हे ) आणि उर्वरित विभागाकरिता कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र २० गुंठे (०.२० हे.) अशी मर्यादा राहील. जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रती शेतकरी ४ हेक्टर मर्यादेपर्यंत राहील.

विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधार आधारित पेमेंटसाठी लिंक असावे.

शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in शेतकऱ्यांनी उत्पादन योग्य फळपीक नसताना विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई होऊ शकते. यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनीच योजनेत सहभाग घ्यावा.

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.

विमा योजनेत समाविष्ट जिल्हे आणि संबंधित कंपनी

जिल्हा विमा कंपनी

जळगाव ,नांदेड भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड

जालना फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, परभणी युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि.

धुळे, पुणे, सांगली, लातूर, बुलडाणा, नाशिक, अहिल्यानगर ,

सोलापूर, सातारा, बीड, वाशीम बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

- विनयकुमार आवटे, ९४०४९६३८७०

(कृषी संचालक (नियोजन व प्रक्रिया), कृषी आयुक्तालय, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT