Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Jalna Crop Insurance: जालना जिल्ह्यात १९७ कोटी विमा भरपाई मंजूर; खात्यात जमा होणार

Kharif 2024 Insurance Payout: जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिप २०२४ मधील पिकनुकसानीपोटी १९७ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे.

Anil Jadhao 

Pune News: जालना जिल्ह्यात खरिप २०२४ मधील पीक नुकसानपोटी शेतकऱ्यांना एकाच ट्रीगर अंतर्गत भरपाई मंजूर करण्यात आली आहे. या ट्रीगरमधून शेतकऱ्यांना १९७ कोटी रुपये भरपाई मिळणार आहे. मात्र यापैकी अजूनही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात नाही. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून भरपाई मंजूर झाली. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रीगरमधून भरपाई मंजूर नसल्याचे दिसते. 

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीकविम्याच्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणीपश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई मंजूर झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये या चारही ट्रीगरमधून भरपाई मंजूर झाली. काही जिल्ह्यांमध्ये तीन ट्रिगर तर काही जिल्ह्यांमध्ये दोन ट्रीगरमधून भरपाई मंजूर करण्यात आली. मात्र जालना जिल्ह्यात एकाच ट्रीगरमधून भरपाई मंजूर करण्यात आली. 

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रीगरमधून भरपाई मंजूर झाली आहे. विमा कंपन्यांना राज्याने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता दिल्यानंतर स्थानिक नैगर्सिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून मंजूर झालेली भरपाई देण्यास सुरुवात केली. काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर जमा होईल. 

जालना जिल्ह्यात खरिप हंगाम २०२४ मधील भरपाईपोटी आतापर्यंत केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून भरपाई मंजूर झाली आहे. २३ एप्रिलपर्यंत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १९७ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली. मात्र आद्याप या भरपाईचे वाटप सुरु नसल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट होते. म्हणजेच विमा कंपनीकडे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भरपाई प्रलंबित आहे. 

जालना जिल्ह्यात काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई काढण्याचे काम सुरु आहे. त्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. या दोन्ही ट्रीगरमधून मिळणारी भरपाई राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा दुसरा विमा हप्ता कंपन्यांना दिल्यानंतर खात्यात जमा केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT