Crop Insurance: २३ एप्रिलपर्यंत विम्याचे १८७४ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Farmer Compensation: शेतकऱ्यांच्या खात्यात २३ एप्रिलपर्यंत विमा कंपन्यांनी १ हजार ८७४ कोटी रुपये भरपाई जमा केली. कंपन्यांकडे विमा भरपाईचे अजूनही १ हजार ३०७ कोटी रुपये प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांना एकूण ३ हजार १८२ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे.
Farmer Compensation
Farmer CompensationAgrowon
Published on
Updated on

Pune News: शेतकऱ्यांच्या खात्यात २३ एप्रिलपर्यंत विमा कंपन्यांनी १ हजार ८७४ कोटी रुपये भरपाई जमा केली. कंपन्यांकडे विमा भरपाईचे अजूनही १ हजार ३०७ कोटी रुपये प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांना एकूण ३ हजार १८२ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. भरपाई निश्चित करण्याचे काम अजूनही सुरु असून भरपाईची रक्कम वाढणार आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.

पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यात रोज भरपाई जमा करत आहेत. तसेच भरपाईची रक्कम जिल्हापातळीवर निश्चित करण्याचे कामही सुरु आहे. त्यामुळे भरपाईची रक्कमही दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच विमा कंपन्या खात्यात पैसे जमा करत असल्याने प्रलंबित भरपाईची रक्कमही कमी होत आहे. त्यामुळे रोज एकूण भरपाई, खात्यात जमा झालेली भरपाई आणि प्रलंबित भरपाईची रक्कम बदलत आहे. 

Farmer Compensation
Crop Insurance Compensation : पीकविमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास प्रारंभ

२३ एप्रिलच्या अहवालानुसार, राज्यातील शेतकऱ्यांना एकूण ३ हजार १८२ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी २ हजार ४६९ कोटी रुपये भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून मंजूर झाली. तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रीगरमधून ७१३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. दोन्ही ट्रीगरमधून मिळणारी भरपाई वाढताना दिसत आहे. तसेच दोन्ही ट्रीगरची भरपाई खात्यात जमा करण्याचे काम देखील सुरु आहे. 

Farmer Compensation
Crop Insurance Compensation: गोवर्धन चोपडे यांना मिळाली एकूण ४,४२७ रुपये भरपाई

खात्यात जमा भरपाई

शेतकऱ्यांना ३ हजार १८२ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी २३ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १ हजार ८७४ कोटी रुपये जमा करण्यात आले. तर आणखी १ हजार ३०७ कोटी रुपये जमा होणार आहेत. स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून मंजूर झालेल्या २ हजार ४६९ कोटी रुपयांपैकी १ हजार १७२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रीगरमधून ७१२ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी ७०१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. 

दोन ट्रीगरचीच भरपाई

राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती या दोन ट्रीगरमधून भरपाई दिली जाते. सध्या या दोन ट्रीगरमधूनच भरपाई मंजूर करण्याचे आणि खात्यात भरपाई मंजूर करण्याचे काम सुरु आहे. राज्याने आपल्या हिस्स्याचा दुसरा हप्ता दिल्यानंतर काढणीपश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com