Gokul Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Milk Rate : दूध संस्थांना प्रतिलिटर किमान पन्नास पैसे प्रोत्साहन अनुदान द्या; `गोकुळ`च्या अध्यक्षांची मागणी

Gokul Chairman Arun Dongale : दूध संस्थांना प्रोत्साहन म्हणून प्रतिलिटर किमान पन्नास पैसे द्यावेत, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केली.

sandeep Shirguppe

Gokul Dudh Sangh : गाय दूध अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. तरीही गावपातळीवरील दूध संस्था यातून काम करीत आहेत, अशा दूध संस्थांना प्रतिलिटर किमान पन्नास पैसे प्रोत्साहन म्हणून द्यावे', अशी मागणी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केली. दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या दालनात राज्यातील प्रमुख दूध संघांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

डोंगळे म्हणाले, 'शासनाने गाय दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले आहे. ही अनुदान प्रक्रिया राबविण्यासाठी काम करणाऱ्या प्राथमिक दूध संस्थांना यामध्ये कोणताही मोबदला मिळत नाही. त्यामुळे संस्था पातळीवर उदासीनता दिसून येत आहे.संस्थांकडून शासनाच्या नियमानुसार ज्या पध्दतीने यायला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. यासाठी दूध संस्थांना किमान प्रतिलिटर पन्नास पैसे दिले पाहिजेत.

राज्यातील गाय दूधदराचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर शासनाने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाची योजना जाहीर केली. ही योजना एक महिन्यासाठी केली आहे.

११ जानेवारी ते १० फेब्रुवारी या काळात शासनाने त्यामध्ये आणखीन एक महिन्याची वाढ दिलेली आहे. असे असतानाही या अनुदान योजनेचा लाभ आजपर्यंत नगण्य दूध उत्पादकांना मिळालेला आहे.

दूध उत्पादकांना तातडीने अनुदान देण्यासाठी नियम/ अटी शिथिल केल्या पाहिजेत. तरच हे अनुदान थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा करता येणार आहे. यावेळी दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे व आयुक्त प्रशांत मोहोड उपस्थित होते.

दरम्यान, दूध संस्थांना प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यासाठी शासनही सकारात्मक आहे. लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे डोंगळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT