Solapur ZP  Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Development Department : यशवंत पंचायतराज समितीकडून सोलापूर जिल्हा परिषदेची तपासणी

Solapur ZP : ग्रामविकास विभागाच्या वतीने यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत पुरस्कारासाठी राज्यस्तरीय तपासणी समितीकडून सोलापूर जिल्हा परिषदेची तपासणी करण्यात आली.

Team Agrowon

Solapur News : ग्रामविकास विभागाच्या वतीने यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत पुरस्कारासाठी राज्यस्तरीय तपासणी समितीकडून सोलापूर जिल्हा परिषदेची तपासणी करण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे आणि रायगड जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे या द्विसदस्यीय समितीने जिल्हा परिषदेच्या प्रस्तावातील सर्व बाबींची तपासणी केली.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनीषा वाकडे -ठोके यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांचे स्वागत केले, तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बडे यांचे स्वागत कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनी शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे बरोबरच विविध नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात आलेले आहेत. त्याचे सादरीकरण व विविध पुरस्कार प्राप्त झालेली माहिती समिती समोर सादर करण्यात आली. देशपातळीवर स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात सोलापूर जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकविला आहे.

प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांनी जिल्हा परिषदेच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या फेसबुक, सोशल मीडिया अंतर्गत कामाचे समितीने कौतुक केले.

सीईओ कुलदीप जंगम व अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीकांत मिरगणे, शिक्षणाधिकारी शेख, कार्यकारी अभियंता खरात, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, अधीक्षक अनिल जगताप, कक्ष अधिकारी सचिन साळुंखे, अधीक्षक स्वामी, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी यासाठी नियोजन करून माहिती सादर केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

RBI Report : देशातील महागाई दर कमी होणार; रब्बी उत्पादन वाढीचा आरबीआयचा अंदाज 

Soybean Market : सोयाबीनच्या हमीभावाला बारदान्याची अडचण

Pandharpur Wari Management : वारी कालावधीत वारकऱ्यांच्या सुविधांबाबत योग्य नियोजन करावे

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाने पिकांचे अंदाजे २ कोटींचे नुकसान

Crop Damage : कळंबामध्ये भात, सोयाबीन वाचविण्यासाठी धडपड

SCROLL FOR NEXT