Minister Radhakrishna Vikhe Patil
Minister Radhakrishna Vikhe Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Minister Radhakrishna Vikhe Patil : राहात्यात पीक नुकसानीची पालकमंत्र्यांकडून पाहणी

Team Agrowon

Nagar Crop Damage News : तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या द्राक्षबागेतील मण्यांना नव्हे, तर शेतकऱ्यांच्या काळजाला तडे गेलेत. आधीच मातीमोल भावाने विकला जाणारा भाजीपाला शेतातच मातीमोल झाला. मका, हरभरा भुईसपाट झाला.

गव्हाचे पीक लोळले, दोन दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीने राहाता तालुक्यातील राजुरी-ममदापूर परिसरातील शेतीही उद्‍ध्वस्त झाली.

त्यामुळे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. नुकसानीपोटी मदत लवकर देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

राहाता तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी (ता. १९) पाहणी करत शेतकऱ्यांना धीर देऊन तातडीने मदत मिळवून देण्याचे अश्वासन दिले.

जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. पाहणीनंतर मंत्री विखे यांनी जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतला.

विखे म्हणाले, की नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्‍याचे आदेश दिलेत. त्यावर संपाचा परिणाम होणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्‍या पाठीशी आहे. निकष बदलून मदत करू. शेती कर्जाबाबतही मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्र्यांशी बोलून लवकरच निर्णय घेऊ.

श्रीरामपूर तालुक्‍यातील भोकर येथील राजू नामदेव मोरे यांचा वीज पडून मृत्‍यू झाला. त्‍यांच्‍या कुटुंबीयांना तातडीची मदत म्‍हणून चार लाख रुपये देण्‍याच्‍या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या अस्मानी संकटात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा संरक्षण देण्याचे जाहीर केले.
राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane FRP : सोलापुर जिल्ह्यात २५७ कोटींची ‘एफआरपी’ थकित

Vegetable Production : भाजीपाला उत्पादनाचे गणित बिघडले

Summer Heat : उन्हाच्या तीव्रतेचा फळे, भाजीपाला उत्पादनावर परिणाम

Crop Damage Subsidy : पीकनुकसानीचे ८८ कोटींवर अनुदान ‘अपलोड’

Dungmanure Shortage : बागायतदारांना शेणखताचा तुटवडा

SCROLL FOR NEXT