Women Empowerment Agrowon
ॲग्रो विशेष

Women Empowerment : शेतीपूरक व्यवसायांसाठी पुढाकार घ्यावा : मोहिते

Sitabai Mohite : कृषी प्रक्रिया उद्योग, कृषी पर्यटन, शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घ्यावा,’’ असा सल्ला सिंधी (जि. जालना) येथील उद्योजिका सीताबाई मोहिते यांनी महिलांना दिला.

Team Agrowon

Buldhana News : ‘‘कामाचे वितरण, कामाप्रती निष्ठा व विश्वास या त्रिसूत्रीचा महिला गटाने वापर केल्यास प्रगती निश्चित होईल. गावात एक उद्योग सुरू झाला तर १२ ते १५ जणांना शाश्वत रोजगार मिळेल.

त्यामुळे कृषी प्रक्रिया उद्योग, कृषी पर्यटन, शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घ्यावा,’’ असा सल्ला सिंधी (जि. जालना) येथील उद्योजिका सीताबाई मोहिते यांनी महिलांना दिला.

कृषी महोत्सव व प्रदर्शनात आयोजित महिला गटांच्या कार्यक्रमात मोहिते बोलत होत्या. खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे, बाजार समितीचे सभापती माधव जाधव उपस्थित होते.

‘‘गटाचा हेतू महिलांचे सक्षमीकरण, महिलांना सन्मान मिळण्यासाठी आहे. कर्जाचा उपयोग व्यवसाय वृद्धीसाठी करून कर्ज परतफेडीचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ८ ते १० विक्री केंद्र देऊ.

ऑनलाइन विक्रीसाठी कंपन्यांकडे प्रयत्न करू. यासाठी काही गटांनी उत्पादनाची, काही गटांनी वितरणाची तर काहींनी प्रचार-प्रसिद्धीची बाजू सांभाळावी,’’ असे जाधव म्हणाले. कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत तब्बल ५७ हजारांवर नागरिकांनी कृषी महोत्सवाला भेट दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT