Jaykwadi dam Agrowon
ॲग्रो विशेष

Jaykwadi Dam : ‘जायकवाडी’त पाण्याची २३४४५ क्युसेकने आवक सुरू

Jaykwadi Water Storage : नाशिक, नगर भागांतील मुळा धरण समूह, प्रवरा धरण समूह, गंगापूर धरण समूह व गोदावरी दारणा धरण समूहातून ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या संचालकांनी ३० ऑक्टोबरला दिले होते.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पात नगर, नाशिक भागांतील प्रकल्पांतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे आवक सुरू झाली आहे. बुधवारी (ता. २९) सकाळी सहा वाजताच्या सुमारास प्रकल्पात २३४४५ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

दिवसभर हे प्रमाण कमी-अधिक होत होते. झालेला पाऊस लक्षात घेता अपव्यय होऊन येणाऱ्या अपेक्षित पाण्यात आता वाढ होईल का, अपव्यय टळेल का? टळेल तर तो किती प्रमाणात, आदी प्रश्नश्‍न यानिमित्ताने चर्चिले जात आहेत.

नाशिक, नगर भागांतील मुळा धरण समूह, प्रवरा धरण समूह, गंगापूर धरण समूह व गोदावरी दारणा धरण समूहातून ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या संचालकांनी ३० ऑक्टोबरला दिले होते.

त्या आदेशाची अंमलबजावणी आताच्या घडीला सुरू आहे. या महिन्यातील २४-२५ तारखेपासून नाशिक, नगर भागांतील विविध प्रकल्पांतून टप्प्याटप्प्याने जायकवाडीच्या दिशेने आदेशित पाणी सोडण्याची पावले उचलली गेली.

याच दरम्यान पाणी येण्याच्या मार्गात तसेच जायकवाडी लाभक्षेत्रात जोरदार झालेल्या पावसामुळे जायकवाडीत पाण्याची आवक नाशिक, नगर भागांतील पाणी येण्याआधीच सुरू झाली होती. शिवाय पाणी सोडल्यानंतर झालेल्या पावसामुळे पाण्याचा होणारा अपव्ययही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारा अपव्यय टाळून सोडण्यात आलेल्या पाण्यापैकी किती पाणी जायकवाडी प्रकल्पात येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मंगळवारी (ता. २८) सायंकाळी सहा वाजता जायकवाडीत २६८२६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. बुधवारी सकाळी सहा वाजता ती आवक २३ हजार ४४५ क्युसेकवर आली होती. त्याच वेळी जायकवाडीतील उपयुक्त पाणीसाठा ४१.४३ टक्क्यांवर पोहोचला होता.

गतवर्षी आजच्या घडीला प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ९८.७९ टक्के इतका होता. बुधवारी सकाळी ६ वाजता जायकवाडी प्रकल्पातून उजव्या कालव्याद्वारे ३०० क्युसेकने, तर डाव्या कालव्यातून ७०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT