Agriculture Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insect Infestation : सततच्या पावसामुळे पिकांमध्ये किडींचा प्रादुर्भाव

Crop Issue : सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिके पिवळी पडली आहेत. पिकांमध्ये तणांची वाढ झाली आहे. कपाशीवर रसशोषण करणाऱ्या मावा, पांढरी माशी, सोयाबीनवर उंट अळीचा प्राद्रु्र्भाव आढळून येत आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यात मागील आठवडाभरात अत्यंत हलका ते मध्यम पाऊस झाला. सूर्यप्रकाश नाही. सततच्या पावसामुळे सखल भागातील तसेच चिभड जमिनीवरील पिकांमध्ये पाणी साचून राहिले आहे. परिणामी सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिके पिवळी पडली आहेत. पिकांमध्ये तणांची वाढ झाली आहे. कपाशीवर रसशोषण करणाऱ्या मावा, पांढरी माशी, सोयाबीनवर उंट अळीचा प्राद्रु्र्भाव आढळून येत आहे. जमिनी वाफसा स्थितीत नसल्यामुळे आंतरमशागती तसेच फवारणीची कामे करता येतनसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

परभणी जिल्ह्यात २०२३ च्या तुलनेत यंदा जून तसेच जुलै महिन्यातआजवर अपेक्षित सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गेल्या १० ते १५ दिवसात हलका ते मध्यम पाऊस झाला. भीज पावसामुळे जमिनीतील ओलाव्यात मोढी वाढ झाली. पाणथळ, चिभड जमिनीवरील पीकांमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा होत नाही. पाणी साचल्यामुळे जमिनीतून अन्नद्रव्यांचा पुरवठा होत नसल्याने पिकांची पाने पिवळी पडून गळून जात आहेत.

पावसाचे प्रमाण अधिक असलेल्या मंडलातील ओढे, नाले, नद्या प्रवाहित झाल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा पाऊस झाला मात्र जुलै महिन्यातआजवर अपेक्षित सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. मागील आठवडाभरातील सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मंडलातील ओढे,नाल्यामध्ये पाणी वाहू लागले आहे.खोल भागातील तसेच चोपण जमिनीवरील पिकांमध्ये पाणी साचले आहे.

ढगाळ वातावरण, सुर्यप्रकाशाचा अभाव यामुळे सोयाबीन, कपाशीवर किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.दरम्यान, सोमवारी (ता. २९) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांमध्ये परभणी जिल्ह्यात सरासरी २ मिमी, जुलै महिन्यात आजवर सरासरी २२८.४ मिमी तर यंदा १ जून पासून एकूण सरासरी ३९८.८ मिमी (११३.८ टक्के) तर हिंगोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ७.२ मिमी, जुलै महिन्यात सरासरी २६३.१ मिमी तर यंदा १ जून पासून एकूण सरासरी ४१२.२ मिमी (१०७.२ टक्के) पाऊस झाला.

आमच्या भागात मागील १० ते १२ दिवसात सतत पावसामुळे पाणी साचून राहिल्याने चिभड जमिनीवरील पिके पिवळी पडली आहेत. ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर मावा, पांढरी माशी तर सोयाबीनवर उंट अळी, केसाळ अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.
बाबासाहेब रन्हेर, कृषिभूषण, बाभळगाव, ता. पाथरी, जि. परभणी.
१२ जुलै पासून सतत पाऊस सुरु आहे. लवणाच्या जमिनीवर पाणी साचून राहिल्याने तूर तसेच सोयाबीनचे मोठेनुकसान झाले आहे. अधून मधून पाऊस सुरु असल्यामुळे कीड नियंत्रणासाठी फवारणी करता येत नाहीत.
शंकर गुट्टे, बेलुरा, जि. हिंगोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT