Cow Conservation Day Agrowon
ॲग्रो विशेष

Desi Cow Conservation Day: देशी गोवंशसंवर्धन दिन २२ जुलै रोजी साजरा होणार

July 22 Desi Cow Day: देशी गाईंच्या संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्यासाठी २२ जुलै रोजी शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन साजरा करण्यात येणार आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: देशी गाईंच्या संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्यासाठी २२ जुलै रोजी शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन साजरा करण्यात येणार आहे.राज्य सरकारने गोसेवा आयोगाच्या पत्रानंतर आदेश काढले असून राज्यभर हा दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवशी चर्चासत्रे, प्रदर्शने, शिबिरे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही शासन आदेशात म्हटले आहे.

आदेशात म्हटले आहे, की देशी गायीच्या दुधाची उपयुक्तता तसेच शेण आणि गोमूत्राचे महत्त्व विचारात घेऊन गाईस कामधेनू असे संबोधण्यात येते. राज्यातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या देशी जातीच्या गाई आढळतात.

मराठवाड्यात देवणी, लाल कंधारी, पश्‍चित महाराष्ट्रात खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी, विदर्भात गवळाऊ, कोकणात कोकण कपिला अशा देशी गोवंश जाती आहेत. राज्यातील देशी गायींच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे संवर्धनासाठी राज्य सरकारने याआधी देशी गाईला राज्यमाता गोमाता असा दर्जा दिला आहे.

देशी गायींच्या संख्येत घट होण्यामागे संकरित गायींच्या तुलनेत असलेली कमी उत्पादनक्षमता आणि प्रजननक्षमता ही कारणमीमांसा विचारात घेऊन देशी गाईंची संख्यात्मक वाढ करण्याबरोबरच गुणात्मक वाढ करण्यासाठी त्यांची प्रजननक्षमता व उत्पादनक्षमता वाढवून उच्च वंशावळीच्या देशी गाई निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या पार्श्‍वभूमीवर देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन साजरा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

२२ जुलै रोजी चर्चासत्रे, प्रदर्शने, शिबिरे, स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने देशी गाईंच्या संख्येत वाढ करण्याबरोबरच त्यांची उत्पादनक्षमता आणि प्रजननक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याबरोबरच देशी गाईंच्या संवर्धनाचे महत्त्व तसेच पशुजन्य उत्पादनांचे महत्त्व ग्राहकांना पटवून देऊन देशी गाई पशुपालकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी हा दिवस उपयुक्त ठरेल असे आदेशात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Technology: कंपोस्ट खते देण्यासाठी साइड ट्रेंचर, कंपोस्ट ॲप्लिकेटर

Jansuraksha Kayda: जनसुरक्षा कायदा नक्की कुणासाठी?

Maharashtra Logistic Park: ड्राय पोर्ट : नकोत कोरड्या घोषणा

Climate Change: हवामान बदलाचा विषय राजकीय अजेंड्यावर यावा 

Kharif Crop Damage: उसासह खरीप पिके ‘हुमणी’च्या विळख्यात

SCROLL FOR NEXT