Heat wave  Agrowon
ॲग्रो विशेष

Heat Wave : यंदाचा जून अंगाची लाहीलाही करणाराच

Weather Update : यंदा जून महिन्यात भारताने उष्णतेच्या तीव्र लाटा अनुभवल्या. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात तापमानाच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात झाल्यापासून यंदाचा जून आतापर्यंतचा सर्वांत उष्ण महिना ठरला.

Team Agrowon

New Delhi News : यंदा जून महिन्यात भारताने उष्णतेच्या तीव्र लाटा अनुभवल्या. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात तापमानाच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात झाल्यापासून यंदाचा जून आतापर्यंतचा सर्वांत उष्ण महिना ठरला. युरोपियन युनियन (ईयू)ची हवामान संस्था असलेल्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसेस या संस्थेने यावर शिक्कामोर्तब केले आहे. सलग १२ व्या महिन्यात तापमान पूर्व औद्योगिक काळातील सरासरीपेक्षा दीड अंश सेल्सिअने अधिक नोंदविले गेले. इ.स. १८५० ते १९०० हा काळ पूर्व औद्योगिक म्हणून ओळखला जातो.

जूनमध्ये भारतासह अनेक देशांनी उष्णतेच्या तीव्र लाटा तसेच पूर, वादळेही अनुभवली. एकूण जागतिक लोकसंख्येपैकी ६० टक्के लोकांना अतिउष्णतेचा सामना करावा लागला. संशोधकांच्या मते, गेल्या वर्षी जुलैपासूनचा प्रत्येक महिना उष्ण होता. यंदाचा नुकताच संपलेला जून आतापर्यंतचा सर्वांत उष्ण ठरला. या महिन्यात जागतिक सरासरी तापमान १६.६६ अंश असते.

मात्र, यंदाच्या जूनमध्ये १९९१ ते २०२० या काळातील सरासरी तापमानापेक्षा ०.६७ अंश अधिक तापमान नोंदविले गेले. त्याचप्रमाणे, जून २०२३ चा तापमानाचा विक्रम मोडीत काढत यंदाच्या जूनने ०.१४ अंश सेल्सिअस अधिक तापमान नोंदविले. २०२३-२४ मध्ये सक्रिय असलेला एल निनो आणि मानवी हस्तक्षेपामुळे झालेला हवामान बदल या दोन्ही कारणांमुळे यावर्षीचा जून सर्वाधिक उष्ण ठरला.

वायव्य भारतासाठीही यंदाचा जून १९०१ पासूनचा सर्वाधिक तापमानाचा होता. यंदाच्या उन्हाळ्यात देशात उष्माघाताची ४० हजार प्रकरणे नोंदविली गेली तर १०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला.

संयुक्त राष्ट्रांच्या २०१५ मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या हवामान परिषदेत जागतिक तापमानवाढ दीड अंश सेल्सिअसच्या मर्यादेत ठेवण्याबद्दल जगभरातील प्रमुख नेत्यांनी वचनबद्धता दर्शविली होती. हरितगृह वायूच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान पूर्व औद्योगिक काळाच्या तुलनेत आधीपासूनच १.२ अंश सेल्सिअसने वाढत असून जगभरात दुष्काळ, पूर, अतिवृष्टी आदी घटनांना ते कारणीभूत ठरत आहे.

प्रमुख निरीक्षणे

- जुलै २०२३ ते जून २०२४ या १२ महिन्यांच्या काळात जागतिक सरासरी तापमान सर्वाधिक

- १९९१ ते २०२० च्या सरासरीपेक्षा ते ०.७६ अंश सेल्सिअसने अधिक

- इ.स.१८५० ते १९०० मधील पूर्व औद्योगिक सरासरीपेक्षा १.६४ अंश सेल्सिअसने जास्त

- यंदा जूनमधील समुद्राच्या तापमानाचीही विक्रमी नोंद

किती जणांवर परिणाम? (आकडे कोटींत)

भारत : ६१.९

चीन : ५७.९

इंडोनेशिया : २३.१

नायजेरिया : २०.६

ब्राझील : १७.६

बांगलादेश : १७.१

यंदाचा जून सर्वाधिक उष्ण ठरण्याकडे सांख्यिकीय विषमतेपलीकडे जात पाहायला हवे. यातून हवामानात मोठ्या प्रमाणावर व सातत्याने होणारा बदल अधोरेखित होतो. टोकाच्या हवामानाचा सिलसिला कुठेतरी थांबला तरी वाढत्या तापमानामुळे नवीन विक्रम मोडले जातील. आपण जोपर्यंत वातावरणात व समुद्रात हरितगृह वायू सोडण्याचे थांबवीत नाही, तोपर्यंत हे अटळ आहे.
- कार्लो बुओन्टेम्पो, संचालक, कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसेस

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT