District Development Committee Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jeevan Mission : जलजीवन मिशनच्या कामांचा स्वतंत्र समिती कडून होणार आढावा

Water Supply Projects Committee : प्रत्येक घरी नळाद्वारे पाणीपुरवठा करणारी महत्त्वाकांक्षी योजना जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात होत असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करावी.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : प्रत्येक घरी नळाद्वारे पाणीपुरवठा करणारी महत्त्वाकांक्षी योजना जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात होत असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करावी. तसेच या समितीने १० जानेवारीला प्रत्यक्ष गावात जाऊन कामांची सद्यःस्थिती पाहावी, असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण अर्थात ‘दिशा’ समितीचे अध्यक्ष खासदार संदिपान भुमरे यांनी आज दिले.

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण अर्थात दिशा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शुक्रवारी (ता. २८) पार पडली. अध्यक्षस्थानी खासदार भुमरे हे होते. तसेच राज्याचे इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण, तसेच दुग्धविकास व ऊर्जा नूतनीकरण मंत्री अतुल सावे, विधानसभा सदस्य आमदार सर्वश्री प्रशांत बंब, रमेश बोरनारे, संजना जाधव, अनुराधा चव्हाण,

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिणीयार, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर तसेच सर्व यंत्रणा प्रमुख आदी उपस्थित होते.

प्रारंभी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीत केंद्र शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांची सद्यःस्थिती जाणून घेणे आवश्यक असल्याचे मत आमदार बंब यांनी मांडले.

‘सोमवारी विशेष बैठक बोलवावी’

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीचे कामाच्या सद्यःस्थितीबाबतही बैठकीत चर्चा झाली. मंत्री श्री. सावे यांनी हा मुद्दा मांडला. जलवाहिन्या टाकताना भविष्यातील देखभाल दुरुस्तीचा मुद्दा विचारात घेऊन काम करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी मांडली. याबाबत राष्ट्रीय महामार्ग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महानगरपालिका व सर्व संबंधित लोकप्रतिनिधी यांची मिळून जलवाहिनी व रस्त्याच्या कामामुळे प्रभावित होणाऱ्या गावांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी सोमवार (ता. ३०) विशेष बैठक बोलवावी, असे निर्देश खासदार भुमरे यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT