Jal Jeevan Mission : 'जलजीवन'च्या कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही

Water Supply Scheme : ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाने पाणी मिळाले पाहिजे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून जलजीवन मिशन योजना कार्यान्वित केली.
MLA Sanjay Jagtap
MLA Sanjay JagtapAgrowon
Published on
Updated on

Pune News : ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाने पाणी मिळाले पाहिजे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून जलजीवन मिशन योजना कार्यान्वित केली. पण या योजनेतील ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने आणि राजकारणामुळे कामे अर्धवट आहेत. ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने ही कामे अत्यंत पारदर्शी व्हावीत.

ठेकेदार पोसण्यासाठी ही योजना नाही याकडे अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावे. जलजीवन योजनेच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असा इशारा देत आमदार संजय जगताप यांनी याबाबत येत्या अधिवेशनात प्रश्न मांडून श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.

MLA Sanjay Jagtap
Jal Jivan Mission : कंत्राटदारांवर कठोर कारवाई होणार

पुरंदर तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी यांच्या समन्वय बैठकीचे आयोजन सोमवारी (ता.२४) करण्यात आले होते. बैठकीत जलजीवन मिशन, पाणीपुरवठा विभाग, पाणंद रस्ते, स्थानिक पातळीवर महसूल विभागाचे कर्मचारी, विद्युत वितरण, वाळू आणि मातीउपसा, एसटी बस आगार, भूमी अभिलेख, पालखी महामार्ग, अंतर्गत रस्ते, तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक आरोग्य केंद्र, पंतप्रधान सडकचे रस्ते, वतनी जमिनींचे प्रश्न, वारसा नोंदी आदी कामांबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या.

MLA Sanjay Jagtap
Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

या वेळी तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार, तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, महावितरणचे अधिकारी अरविंद वनमोरे, बांधकाम विभागाच्या अधिकारी स्वाती दहिवाल, सुदामराव इंगळे, नंदूकाका जगताप, प्रदीप पोमण, माणिकराव झेंडे, विठ्ठलराव मोकाशी, माऊली यादव, सुनीता कोलते, अॅड. गौरी कुंजीर, महादेव टिळेकर, चेतन महाजन, यांसह पाणीपुरवठा, एसटी आगार, भूमी अभिलेख, विविध गावांचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद आणि समन्वयातून पुरंदरच्या तळातील घटकापर्यंत विविध योजनांचा लाभ देण्यास मदत होईल. त्यामुळे यापुढील काळात शासनाच्या खात्यांत एकमेकांत आणि लोकप्रतिनिधींमध्ये संवाद व समन्वय राहील याची काळजी घ्या, असे आवाहन आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) यांनी केले. तसेच येत्या २४ जुलै रोजी आमसभा होणार असून त्यापूर्वी प्रत्येक विभागाची स्वतंत्र आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचेही आमदार जगताप यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com