Cow Milk Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Protest : शेतीमालासह दूधदरासाठी पुण्यात ९ ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन

Milk Rate Protest : केंद्र आणि राज्य शासनाने सर्व मोफत योजना बंद कराव्यात, आम्हाला शासनाचे काही मोफत नको आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : ‘‘गेल्या ५० वर्षांत शेतीमालाचे दर केवळ ८ ते १० पट वाढले. शासनाच्या शेतकऱ्यांसाठीच्या सर्व फुकटच्या योजना बंद कराव्यात; पण शेतीमालाला योग्य भाव द्यावा. गायी, म्हशीच्या दूधदरासाठी ९ ऑगस्टपासून पुणे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या करण्यात येईल,’’ अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत दिली.

केंद्र आणि राज्य शासनाने सर्व मोफत योजना बंद कराव्यात, आम्हाला शासनाचे काही मोफत नको आहे. मात्र शासनाने शेतीमालावर कोणतेही निर्बंध घालू नयेत. सरकारच्या हस्तक्षेपामुळे गेल्या ६० वर्षांत शेतीमालाचे दर आहे तसेच आहेत. परंतु उद्योजकांच्या मालाचे दर दहा पटीने वाढले आहेत.

सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. केंद्र शासन शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये देते; पण शेतकऱ्या‍कडून वर्षाला जीएसटी करातून लाखो रुपये वसूल करत आहे. सर्व रासायनिक खते, कीटकनाशकांसह सर्वच शेतीमालाची जीएसटी करातून मुक्त केला पाहिजे.

राज्यातील दोनशे साखर कारखान्यांची मालकी केवळ २५ कुटुंबीयांकडे आले. त्यामुळे केंद्र शासनाने दोन साखर कारखान्यांतील २५ किलोमीटर अंतराची अट रद्द केली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे.

निर्मला सीतारामन यांनी माहिती घेऊन लवकरच दोन कारखान्यांतील अंतराच्या अटीबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्याचे पाटील यांनी सांगितले. या वेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, महादेव कोरे, आमगोंडा पाटील, शंकर मोहिते, धनपाल माळी, राजू बिरनाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार सुळे, लंकेंचे ऊस प्रश्‍नाकडे दुर्लक्ष

खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार नीलेश लंके यांनी कांदा आणि दूध उत्पादकांच्या प्रश्‍नावर आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन राजकीय आहे. सुळे, लंके यांनी शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्‍नांवरही बोलण्याची गरज आहे. ऊस उत्पादकांना बिले मिळत नाहीत, त्याकडेही का ते दुर्लक्ष करीत आहेत, असा सवालही रघुनाथदादा पाटील यांनी उपस्थित केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rasta Roko Protest : वडखळ-अलिबाग राज्यमार्ग दीड तास ठप्प

India Trade Policy: टॅरिफ बनले शस्त्र, पण भारत कोणाच्याही दबावाखाली झुकणार नाही, अन्न सुरक्षेबाबत कृषिमंत्र्यांचे महत्त्वाचे विधान

Fruit Crop Insurance : हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच, उडदाचे भाव कमी, केळीचे दर स्थिर, कारलीला उठाव तर गवार तेजीतच

Farmer Relief : औशाचे आमदार करणार शेतकऱ्यांना मदत

SCROLL FOR NEXT