Maharashtra Assembly Election Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक इंदापुरात ७६ टक्के मतदान

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता.२०) झालेल्या मतदानात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील २१ मतदार संघांसाठी ६१.०५ टक्के मतदान झाल्याची अंतिम आकडेवारी प्रशासनाकडून सादर करण्यात आली.

Team Agrowon

Pune News : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता.२०) झालेल्या मतदानात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील २१ मतदार संघांसाठी ६१.०५ टक्के मतदान झाल्याची अंतिम आकडेवारी प्रशासनाकडून सादर करण्यात आली.

जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ७६.१० टक्के मतदान इंदापूर तालुक्यात झाले आहे. यामुळे इंदापूर तालुक्यातील लढतीसह जिल्ह्यातील बारामती, पुरंदरमधील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. या लढतींमध्ये कोण बाजी मारणार हे शनिवारी (ता.२३) स्पष्ट होणार आहे.

बहुतांश मतदार संघात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा दोन ते तीन टक्क्यांनी मतदान वाढल्याने ‘लाडक्या बहिणीं’चा प्रभाव मतदानावर आहे का, अशी चर्चा विविध मतदार संघात रंगली आहे. तर महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांची संख्या, झालेल्या बंडखोरीमुळे तुल्यबळ उमेदवारांची वाढलेली संख्या यामुळे देखील मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाल्याचा अंदाज आहे.

ग्रामीण भागातील मतदार संघातील मतमोजणी त्या-त्या तालुक्याच्या मुख्यालयी होणार आहेत. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. शनिवारी (ता.२३) दुपारी चार वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

मतदार संघनिहाय मतदानाची अंतिम आकडेवारी

पुणे जिल्हा ग्र मीण टक्केवारी

जुन्नर ६८.४४

आंबेगाव ७०.०१

खेड आळंदी ६७.७०

शिरूर ६८.५०

दौंड ७३.२७

इंदापूर ७६.१०

बारामती ७१.०३

पुरंदर ६०.०२

भोर ६८.०१

मावळ ७२.१०

पिंपरी-चिंचवड

चिंचवड ५६.७३

पिंपरी ५१.२९

भोसरी ६१.१४

पुणे शहर

वडगाव शेरी ५५.७१

शिवाजीनगर ५०.९०

कोथरूड ५२.१८

खडकवासला ५६.५३

पर्वती ५५.२६

हडपसर ५०.११

कँटोन्मेंट  ५२.८५

कसबा ५८.७६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT