Solapur Vidhansabha Election : सोलापुरातील सर्वच मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी सोलापूर शहरातील सर्वच्या सर्व मतदान केंद्राचे वेबकास्टिंग होणार आहे.
Maharashtra Vidhansabha Election
Maharashtra Vidhansabha ElectionAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आहे. मतदानासाठी आवश्‍यक असलेली प्रशासकीय तयारी देखील अंतिम टप्प्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी सोलापूर शहरातील सर्वच्या सर्व मतदान केंद्राचे वेबकास्टिंग होणार आहे.

ग्रामीण भागात त्या विधानसभा मतदारसंघातील ५० टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची यंत्रणा असणार आहे. लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात मतदाना दरम्यान गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते. त्यामध्येमाढा लोकसभा मतदारसंघातील सांगोल्यात ईव्हीएम पेटविण्याचा प्रयत्न झाला तर करमाळ्यात ईव्हीएमवर हातोडा मारण्यात आला होता. सोलापूर लोकसभा मतदारसंघात उत्तर सोलापूर तालुक्यात दुधात बोट बुडवून मतदान करण्यात आले.

Maharashtra Vidhansabha Election
Election Process : मतदान केंद्रांवर ‘वेबकास्टिंग’द्वारे नियंत्रण

लोकसभा निवडणुकीत कांद्याने ईव्हीएमचे बटण दाबण्याचाही प्रयत्न झाला होता. विधानसभा निवडणुकीत हे सर्व प्रकार टाळण्यासाठी मोठी खबरदारी घेण्यात आली आहे. या शिवाय मतदान केंद्रातील गैरप्रकारही टाळण्यास वेबकास्टिंगमुळे मदत होणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात एकूण ३८ लाख ४८ हजार ८६९ एवढे मतदार आहेत.

त्यामध्ये १९ लाख ७१ हजार ८३१ पुरुष तर १८ लाख ७६ हजार ७३८ महिला मतदार आहेत. इतर मतदार ३१० असून जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या ३८ लाख ४८ हजार ८६९ एवढी आहे. सोलापूर जिल्हयामध्ये ३ हजार ७३८ एवढी मतदान केंद्र असून या मतदान केंद्रातून मतदानाची प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यात शहरी भागातील १ हजार १८३ व ग्रामीण भागातील २ हजार ५५५ मतदान केंद्र आहेत.

वेबकास्टिंग म्हणजे काय?

विधानसभेच्या मतदानासाठी वेबकास्टगसाठी निवडलेल्या मतदान केंद्रात मतदान गोपनियतेचा भंग होणार नाही, अशा पद्धतीने एक कॅमेरा असणार आहे. यामुळे त्या केंद्रावर मतदान सुरू होण्यापासून संपेपर्यंतच्या सर्व घडामोडींचे चित्रण होणार आहे. हे चित्रण थेट सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग यांना पाहता येणार आहे. यामुळे केंद्रावरील सोयी-सुविधा, कामकाज व केंद्रावरील हालचाली वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाहता येणार आहे.

विधानसभानिहाय मतदान केंद्र „  

करमाळा : ................. ३४७ „  

माढा : ..................... ३५५ „  

बार्शी : .................... ३३३ „  

मोहोळ : ................... ३३६ „  

सोलापूर शहर उत्तर : ........ २८९ „  

सोलापूर शहर मध्य : ....... ३०४ „  

अक्कलकोट : ............. ३९६ „  

सोलापूर दक्षिण : ........... ३६७ „  

पंढरपूर : ................... ३५७ „  

सांगोला : .................. ३०९ „  

माळशिरस : ................ ३४५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com