Sangli Flood Update Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Rain Update: ‘कृष्णा’, ‘वारणा’च्या पाणी पातळीत वाढ

Water Level Increased: सांगली जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. सोमवारी (ता. २६) सकाळपासून पावसाने उघडीप दिली असली तरी, शेतात पाणी साचून राहिले आहे.

अभिजीत डाके

Sangali News: सांगली  जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. सोमवारी (ता. २६) सकाळपासून पावसाने उघडीप दिली असली तरी, शेतात पाणी साचून राहिले आहे. दरम्यान, गेले दहा दिवस पाऊस सुरू असल्यामुळे ओढे, नाल्यांतून पाणी वाहत आहे. शेतीचे बांध पाण्याने भरले आहेत. या पावसाचा खरीप पिकांवर थेट परिणाम होणार आहे. सद्यःस्थितीत पेरण्या लांबणीवर गेल्या आहेत. फळबागांचेही नुकसान झाले आहे. काही ठिकाणी माती वाहून गेली आहे. एकंदरीत, अतिपावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार आहे.

जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. दहा दिवसांत १७४.२ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून राहिले आहे. नुकसान टाळण्यासाठी शेतातून पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांचा खटाटोप सुरू आहे. पावसामुळे फळबागांसह उन्हाळी पिकांना फटका बसल्याचे चित्र आहे. खानापूर, तासगाव, जत तालुक्यांतील अनेक गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. खरीप हंगामाची तयारी करण्याचे सध्याचे दिवस आहेत.

शिराळा परिसरात मोठ्या प्रमाणात धूळवाफ भात पेरणी केली जाते. २५ मे हा पेरणीचा मुहूर्त असतो. मात्र, गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने ही संधी हिरावली आहे. जोरदार पाऊस झाल्याने आता मशागती करण्यास अडथळा तयार झाला आहे. जमिनीचा वाफसा येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

नदीकाठच्या विजेवरील मोटारी काढल्या

कृष्णा, वारणा आदी नद्यांची पातळी पाच ते सात फुटांनी वाढली आहे. पाऊस अद्याप थांबलेला नाही. जोडूनच मोसमी पावसाचे आगमन होणार आहे. त्यामुळे पुरामध्ये मोटारी बुडू नयेत, यासाठी शेतकऱ्यांनी त्या काढून आणल्या आहेत. एक महिना आधीच शेतकऱ्यांनी सुरक्षित स्थळी मोटारी हलवल्या आहेत.

पाच राज्यमार्गांवरील वाहतूक बंद 

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मॉन्सूनपूर्व संततधार पाऊस सुरू असल्याने बहे, डिग्रज, सांगली आणि म्हैसाळ हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तासगाव तालुक्यातील तीन व कडेगाव तालुक्यातील दोन राज्य मार्गावरील वाहतूक बंद केली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे.

वैरणीला मका केलेला, त्या शेतामध्ये भात पेरायचे होते, मात्र पावसाने मशागत करता आली नाही. दुसऱ्या शेतात भुईमूग करायचा आहे, मात्र तो कधी टोकायचा या विचारात आहे.
- बजरंग पाटील, शेतकरी, ऐतवडे खुर्द

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bank Crop Loan: बॅंकांनी पीककर्ज प्रकरणांत सकारात्मकता ठेवावी : जिल्हाधिकारी संतोष पाटील

Maharashtra Sugar Industry: हंगामाच्या ५० दिवसांनंतरही सात कारखान्यांचे दरावर मौन

MPKV MoU Signed: कृषी विद्यापीठाचा ‘कार्डियन करेक्ट’शी करार

Honey Village Scheme: ‘मधाचे गाव’ योजना देणार रोजगाराचा गोडवा

Devendra Fadnavis BJP Victory: भाकीत खरं ठरलं! भाजपचा नवा रेकॉर्ड, किती जागा जिंकल्या?; फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

SCROLL FOR NEXT