Flood Management : ‘पाऊस आला की पूर’ची भीती दूर होईल

Health Minister Prakash Abitkar : जिल्ह्यातील कोल्हापूर शहरासह नदीकाठच्या गावांमध्ये ‘पाऊस आला की पूर’ या भीतीला जागतिक बँक सहाय्य‍ित महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून कायमचे दूर करता येईल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले
Flood Management
Flood ManagementAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : जिल्ह्यातील कोल्हापूर शहरासह नदीकाठच्या गावांमध्ये ‘पाऊस आला की पूर’ या भीतीला जागतिक बँक सहाय्य‍ित महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून कायमचे दूर करता येईल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी त्यांनी धोरणात्मक कृती आराखडा सादरीकरणानंतर संबंधित सर्व विभाग प्रमुखांना आराखडा अंमलबजावणीच्या अनुषंगाने सूचना केल्या.

या वेळी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे (मित्र) उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहूल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अतिरिक्त आयुक्त मनपा राहुल रोकडे, अधीक्षक अभियंता पाटबंधारे अभिजीत म्हेत्रे उपस्थित होते.

Flood Management
Agricultural Growth: शाश्‍वत विकासच देईल भक्कम आधार

तर दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते. या बैठकीत अभिजीत म्हेत्रे, मित्राचे सल्लागर विनय कुलकर्णी, प्रायमुव्ह संस्थेचे अजित ओक यांनी आराखडे व केलेल्या सर्वेक्षणाबाबत माहिती सादर केली.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीनंतर शहरातील सर्व पावसाच्या पाण्याचा निचरा पंचगंगेच्या इशारा पातळीपर्यंत पुराचे पाणी येईपर्यंत होणार आहे. इशारा पातळीआधी कोणत्याही भागात पुराचे पाणी साठणार नसल्याची माहिती अजित ओक यांनी दिली.

या वेळी पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचा समावेश प्रकल्प अंमलबजावणी दरम्यान घेण्याच्या सूचना केल्या. ते म्हणाले, की जिल्ह्यातील पूरबाधितांमध्ये दरवेळी पाऊस आला की प्रचंड भीती असते.

Flood Management
Flood Management: पुरस्थितीत जनावरांची कशी काळजी घ्याल?

यावर मार्ग काढण्यासाठी चांगला आराखडा तयार केला आहे. यामध्ये वेळोवेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन लोकप्रतिनिधींनी काही विचार मांडले आहेत. तांत्रिकदृष्ट्या योग्य कामांची निवड यात अपेक्षित आहे. याचबरोबर पंचगंगेसह जिल्ह्यातील सर्व उपनद्यांसाठीही या प्रकल्पात विशेष विचार असावा. उपनद्यांचा विस्तार वाढत आहे.

या नद्यांचे खोलीकरण आवश्यक असल्याने त्या उपनद्यांवर उपाययोजना राबविता येतील का ते पाहा अशा सूचना त्यांनी केल्या. सादरीकरणात जलसंधारणाची कामे करणे अनिवार्य आहेत, नैसर्गिक नाले पुन्हा जीवीत केले पाहिजेत, नाल्यांच्या रुंदीत पूर्वीप्रमाणे बदल करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

तसेच खासदार धनंजय महाडिक यांनी जुन्या काळातील काही बांध नद्यांवर अस्तित्वात आहेत त्यांमध्ये बदल करून मोठे बंधारे प्रस्तावित करावे लागतील का, याचा अभ्यास करण्याच्या सूचना केल्या. आमदार चंद्रदीप नरके यांनी उपनद्यांचा विचार करताना तिथे इरिगेशनची कामे व्हावीत. आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील यांनी विचार मांडले. आमदार सतेज पाटील यांनी पूररेषा डीमार्केशनबाबत सूचना केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com