Lemon Agrowon
ॲग्रो विशेष

Lemon Rate : आवक घटल्याने लिंबाची दरवाढ

Lemon Market : सध्या तापमानाने उच्चांक गाठला असून उन्हाने अंगाची काहिली होत आहे. अशात शरीरातील ऊर्जेच्या पातळीत समतोल राखण्यासाठी आहारात लिंबू खूप गुणकारी मानले जाते.

Team Agrowon

Thane News : सध्या तापमानाने उच्चांक गाठला असून उन्हाने अंगाची काहिली होत आहे. अशात शरीरातील ऊर्जेच्या पातळीत समतोल राखण्यासाठी आहारात लिंबू खूप गुणकारी मानले जाते. त्यामुळे लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे; मात्र बाजारात सध्या आवक घटल्याने लिंबाचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. या वाढत्या दरामुळे लिंबू अधिकच आंबट झाल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या रखरखत्या उन्हात लिंबू-पाण्याचा प्रत्येक घोट सुखावणारा वाटतो; मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे आणि उन्हाळ्यात झटपट ताजेतवाने करणारे पेय आता महाग झाले आहे.

डॉक्टरदेखील उन्हाळ्यात लिंबू सरबत पिण्याचा सल्ला देतात. त्यामुळे लिंबाला मागणी वाढत असते. उसाच्या रसातदेखील लिंबू लागते; मात्र आवक कमी आणि किंमत जास्त असल्याने लिंबाने सर्वांना घाम फोडला आहे. लिंबाचे भाव वाढल्याने लिंबू सरबताचे भावदेखील आपोआप वाढले आहेत.

ऐन उन्हाळ्यात बाजारात लिंबाची आवक घटल्याने काही दिवसांपूर्वी अगदी १० रुपयांना ४-५ लिंबू मिळत होते. तेच लिंबू आता १० रुपयांना २ मिळत आहेत; तर आकारमानानुसार लहान लिंबू पाच रुपयांना; तर मोठे लिंबू सात ते दहा रुपयांना मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात लिंबाच्या दराने उसळी घेतल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. ही जमेची बाजू असली, तरी सर्वसामान्यांच्या घशाला मात्र कोरड पडणार आहे.

लिंबाचे भाव

मोठे लिंबू -

७ ते १० रुपयाला एक

छोटे लिंबू -

५ - ६ रुपयाला एक;

तर १० रुपयाला दोन

लिंबू सरबत

हाफ ग्लास १० रुपये,

तर फुल ग्लास १५ रुपये

आधी दोन हजार रुपयांना लिंबाची गोण मिळत होती. आता तीच गोण वाशी मार्केटमध्ये २४०० ते २६०० रुपयांना मिळत आहे. परिणामी, किरकोळ बाजारात लिंबाच्या किमती वाढल्या आहेत.
महेश कुमार, भाजीविक्रेते
आमचा घरगुती खाणावळीचा उद्योग आहे. त्यामुळे किमती वाढल्या असल्या तरी लिंबू खरेदी करणे आवश्यक आहे.
प्रिया पार्टे, महिला उद्योजिका

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT