Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : सातारा जिल्ह्यात टँकरच्या संख्येत वाढ

Water Issue : सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांसह इतरही तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहे.

Team Agrowon

Satara News : सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांसह इतरही तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव, वाई या पाच तालुक्यांत सर्वाधिक ८६ गावे २९८ वाड्यावस्त्यावर ८९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

पावसाच्या कमी प्रमाणामुळे पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्याचीही अडचण भेडसावू लागली आहे. जिल्ह्यात तब्बल एक लाख ४१ हजार १८१ जनता टँकरच्या पाण्यावर अंवलबून आहे. टंचाईच्या झळा सर्वाधिक माण तालुक्यात जाणवत आहेत.

माण तालुक्यात ३७ गावे व २४७ वस्त्यांवर ४६ टँकर सुरू असल्यानेटंचाईची भीषणता दिसून येत आहे. पाण्याची उपलब्धता नसल्याने पिकांचेही नुकसान होणार आहे. माण पाठोपाठ कोरेगाव तालुक्यात १९ टँकरद्वारे २२ गावात पुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यात १२ टँकरद्वारे १३ गावे नऊ वाड्यावस्त्यावरपुरवठा केला जात आहे.

फलटण तालुक्यात ११ टँकरद्वारे १३ व ४३ वाड्यावस्त्यावर पुरवठा केला जात आहे. वाईला एका टँकरद्वारे एका गावातपुरवठा केला जात आहे. तलावांसह विहिरी आणि बोअरवेलची पातळी कमी झाली आहे.

९५ हजार पशुधनांची तहान टँकरवर अवलंबून

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने भूजल पातळीत घट होत आहे. जनावरांची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागवावी लागत आहे. जिल्ह्यात सध्या ९५ हजार ३० पशुधनाची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागत आहे.

६८ विहीर, बोअरवेलचे अधीग्रहण

जिल्ह्यात पाण्याची टंचाई वाढ होत असल्याने विहीर व बोअरवेलचे अधिग्रहणात वाढ केली जात आहे. संरक्षित पाण्यासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील २७ विहिरीचे व ४१ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT