Union Minister of State Kapil Patil Agrowon
ॲग्रो विशेष

E-Cart Scheme : ई-कार्टमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ

Union Minister of State Kapil Patil : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत कृषी विभागातील ई-कार्ड योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.

Team Agrowon

Thane News : जिल्हा परिषद ठाणेअंतर्गत कृषी विभागातील ई-कार्ड योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.

भिवंडी येथील दिवे अंजूर येथे शेतकरी बचत गटांना ई- कार्ट लोकार्पण सोहळा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत सेस फंडातून पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजनेंतर्गत बचत गट यांना ई-कार्ट पुरविणे ही नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे.

योजनेंतर्गत शेतकरी बचत गटांनी स्वत: पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत विकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. बचत गटांना स्वत:चे वाहन उपलब्ध झाल्याने वेळेची बचत होईल, व इतर कामासाठी देता येईल.

वाहनामुळे भाजीपाला स्वच्छ व ताजा राहून भाजीपाला विक्रीचा पूर्ण मोबदला शेतकरी बचत गटांना होणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करून लाभ द्यावा, अशा सूचना पाटील यांनी केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Shortage : पश्चिम आशियातील तणावामुळे खरीप हंगामात खतांची टंचाई; केअरएज रेटिंग्जच्या अहवालात इशारा

Global War Impact: युद्धामुळे जगभरातील शेतकऱ्यांची होरपळ

Konkan Farmers Protest: कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांनी रोखला मुंबई- गोवा महामार्ग

Water Conservation: भूजल संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा

Multi Cropping Farming: बहुपीक पद्धतीतून वाढविले उत्पन्नाचे स्रोत

SCROLL FOR NEXT